Share

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra Fadnavis आमच्याकडे कोणालाही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत आमच्याकडे कोणालाही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत, शरद पावरांना आवाहन करतो मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगावा – देवेंद्र फडणवीस Related News for Youशिवसेना चिन्ह लढाईत नवा ट्विस्ट; सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीने राजकीय चर्चांना उधाण‘तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला’; मनोज जरांगे यांचे शिंदेंवर … Read more

Published On: 

Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadnavis

Eknath Shinde | Ajit Pawar | Devendra Fadnavis

आमच्याकडे कोणालाही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत

आमच्याकडे कोणालाही मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले नाहीत, शरद पावरांना आवाहन करतो मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगावा – देवेंद्र फडणवीस

रोज सकाळी भोंगा वाजतो, त्यापेक्षा विकासकामं दाखवा – एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला

लोकसभेत फेक नरेटिव्ह सेट केलं, पण आता लोकं फसणार नाहीत. रोज सकाळी भोंगा वाजतो, त्यापेक्षा विकासकामं दाखवा असा टोला एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला.

लाडकी बहीण योजनेला कोणी टच केलं तर करेक्ट कार्यक्रम होणार – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला कोणी टच केलं तर करेक्ट कार्यक्रम होणार असा इशार एकनाथ शिंदे यांनी दिला.

म्हणून तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली – एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

राज्यातला सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन त्याच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. तो कॉमन मॅन नव्हे सुपरमॅन व्हायला पाहिजे. राज्यातील सर्वसामान्य माणसाला आम्हाला ताकद द्यायची आहे, म्हणून तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली – एकनाथ शिंदे

मविआच्या काळात विकासकामांना ब्रेक लागला होता – एकनाथ शिंदे

मविआच्या काळात विकासकामांना ब्रेक लागला होता. अडीच वर्षांता मनिआनं प्रकल्प बंद करण्याचं काम केलं. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता. पण महायुतीचं सरकार येताच महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावरून पहिल्या नंबर वर आला – एकनाथ शिंदेंनी मांडला महायुती सरकारचा लेखाजोगा

पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. आम्ही एवढी कामं केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाहीत. अटल सेतून, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोडचं काम सरकारने केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधकच संभ्रमात दिसतात, देवेंद्र फडणवीसांची टीका

विरोधकच संभ्रमात दिसतात, देवेंद्र फडणवीसांची टीका… ठाकरे म्हणाले महायुती सरकारच्या सर्व योजना बंद करणार… ठाकरे पुन्हा योजनांना स्थगिती देण्यासाठी निघालेत – देवेंद्र फडणवीस

होमगार्डचं मानधन सरकारनं दुप्पट केलं – देवेंद्र फडणवीस

वेगवेगळ्या समाजाचं महामंडळ स्थापन केलं… होमगार्डचं मानधन सरकारनं दुप्पट केलं…. ज्याला दिलासा दिला नाही असा एकही घटक नाही… असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सरकारनं नदीजोड प्रकल्प आणला – देवेंद्र फडणवीस

सरकारनं नदीजोड प्रकल्प आणला… सिंचनाच्या क्षेत्रात आम्ही अभूतपूर्ण कामगिरी केली… राज्यातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता साडे आठ रुपयाची वीज ३ रुपयाला पडणार – देवेंद्र फडणवीस

आता साडे आठ रुपयाची वीज ३ रुपयाला पडणार आहे. १० हजार कोटी बजेट आणि पाच हजार कोटी क्रॉस सबसिडीचे आम्ही वाचवणार आहोत… प्रिंटिंग मिस्टेक घोषणा नाही. हा वेल थॉट म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेतलाय. अनेक वर्ष तो चालणार आहे – देवेंद्र फडणवीस

आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद, काहींसाठी ऐलान – देवेंद्र फडणवीस

आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद, काहींसाठी ऐलान… मविआचं स्थगिती सरकार, आमचं गतीशील सरकार… परिवर्तन करणाऱ्या योजना आम्ही आणल्या… असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

आरोप करताना तारतम्य बाळगलं पाहिजे – अजित पवार आरोप करताना तारतम्य बाळगलं पाहिजे… विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहोत… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणीच्या यशामुळे विरेधक गडबडले… असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद, महायुतीचं रिपोर्ट कार्ड प्रदर्शित

महायुतीची संयुक्त पत्रकार परिषदे दरम्यान महायुतीचं रिपोर्ट कार्ड प्रदर्शित करण्यात आलं आहे. आडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा महायुतीकडून प्रकाशित…

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही