Share

आचारसंहिता लागताच एकनाथ शिंदेंना भाजपचा मोठा दणका? अमित शहांनी थेट सांगितले…!

amit shah, ajit pawar, eknath shinde, devendra fadnavis

Amit Shah | विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झालेला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चांना वेग दिला आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजप १ ६ ०  जागेवर लढणार असल्याचे पक्षातील कार्यकर्ते सांगत आहे. तर एकनाथ शिंदे,अजित पवार आणि मित्र पक्षांना राहिलेला जागा मिळतील असे बोलले जात आहे. दरम्यान जागा वाटपाच्या चर्चेमध्ये अमित शहांनी एकनाथ शिंदे ( Eknath shinde ) यांना भाजपने केलेल्या त्यागाची आठवण करून दिली.

मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं पद, ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी त्याग केला, त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत शिंदेंनी भाजपला आणि मित्र पक्षांना झुकतं माप द्यावं, असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदेंकडे धरल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

काय म्हणाले Amit Shah? 

”देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकतं माप द्या” असे अमित शाह म्हणाले असल्याची माहिती आहे. 

शिंदे गट विधानसभा निवडणुकीत १ ० ०  विधानसभेच्या जागेसाठी आग्रही आहे. शिंदेंना १ ० ०  जागा दिल्या तर अजित पवार गटाचं काय करायचं? असा मोठा प्रश्न भाजप केंद्रीय नेतृत्वासमोर आहे. 

भाजप अजित पवारांना ( Ajit Pawar ) झुकते माप देण्याची शक्यता आहे. शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद असल्याने त्यांनी मित्रपक्षांना जास्त जागा द्याव्यात म्हणून भाजप आग्रही असणार आहे. यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण निर्माण होणार आहे.

यावेळी भाजप १ ६ ० जागेवर लढणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा दावा भविष्यात भाजप करताना दिसेल. बहुमताचे संख्याबळ जमवताना अडचण होणार नाही याची काळजी भाजप यावेळी घेताना दिसत आहे.

महाराष्ट्र विधानसभेची सर्व सूत्र अमित शहांनी हातात घेतले आहे. २ ० १ ९ वेळी हे चित्र वेगळं होते, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे केंद्रस्थानी होते.

महत्वाच्या बातम्या

Amit Shah | भाजप अजित पवारांना झुकते माप देण्याची शक्यता आहे. शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद असल्याने त्यांनी मित्रपक्षांना जास्त जागा द्याव्यात म्हणून भाजप आग्रही असणार आहे.

Marathi News Maharashtra Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now