Share

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule : राज्यातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठीचं संपूर्ण वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule 

  • निवडणुकीचं नोटिफिकेशन :  22 ऑक्टोबर 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
  • अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
  • अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
  • मतदान  : 20 नोव्हेंबर 2024
  • मतमोजणी : 23 नोव्हेंबर  2024

Maharashtra Vidhan Sabha Voter List

  • एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
  • नव मतदार – 20.93 लाख
  • पुरूष मतदार – 4.97 कोटी
  • महिला मतदार – 4.66 कोटी
  • युवा मतदार – 1.85 कोटी
  • तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
  • 85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
  • शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
  • दिव्यांग मतदार – 6.32 लाख

Maharashtra Vidhan Sabha Voting Booth List 

  • एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
  • शहरी मतदार केंद्र – 42,604
  • ग्रामीन मतदार केंद्र – 57,582
  • महिला अधिकाऱ्यांची केंद्रे –
  • एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार – 960

Suvidha Portal App 

निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल.

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule : राज्यातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठीचं संपूर्ण वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर …

पुढे वाचा

Marathi News India Maharashtra Mumbai Politics Pune

Join WhatsApp

Join Now