Share

विकासाचा मुद्दा, सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून अतुल सावेंची हॅट्रिककडे वाटचाल

Atul Save Maharashtra Vidhan Sabha Election 2024

Atul Save | छत्रपती संभाजीनगर : पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात असलेले अतुल सावे यांनी विकासाचा मुद्दा समोर करून सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विजय मिळविण्याच्या दृटीने वाटचाल सुरू केली आहे. मागील २ निवडणुकीतील विजयाचा अनुभव यावेळीही कामी येत आहे.

या निवडणूकीत प्रचाराच्या निमित्ताने लोकांमध्ये जाताना श्री. सावे यांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावरच जोर दिल्याचे पाहायला मिळत आहे. आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्याकडे आहे. आपल्या विरोधात उभे असलेले एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे आमदार व खासदार अशी दहा वर्षे लोकप्रतिनिधी होते. त्यांनी कोणती विकास कामे केली? हे सांगावे, असे खुले आव्हान ते देत आहेत. यामुळे प्रचारात रंगत येत असून लोकांना हे आव्हान आवडत आहे.

निवडणूक कुठली असली तरी ती सोपी नसते आणि आपण तिला हलक्यात घेतही नसतो, असेही ते सांगतात. मागील २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या आणि जिंकलेल्या निवडणूका या सूक्ष्म पद्धतीचे नियोजन केल्याने सोप्या झाल्या. आता ६६५ कोटीचे रस्ते,१७८० कोटींची पाणीपुरवठा योजना, ५२ हजार कोटींचे उद्योग हेच आपले भांडवल आहे, असे ते प्रचारात सांगत आहेत. त्यास मतदारांचा प्रतिसादही चांगल्या पद्धतीने मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षानंतर गुरुवारी (ता.१४) शहरात सभा घेतली. ही सभा अतुल सावे यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेत त्यांनी अतुल सावे यांनी शहरासाठी मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शहरवासीयांमध्ये पाण्यासाठी सातत्याने चर्चा होत असताना अतुल सावे यांनी योजनेला गती दिली. तसेच केंद्राने या योजनेसाठी ७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला असल्याचेही मोदींनी आपल्या सभेत सांगितले..

Atul Save Maharashtra Vidhan Sabha Election 2024

महत्वाच्या बातम्या

Atul Save | छत्रपती संभाजीनगर : पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात असलेले अतुल सावे यांनी विकासाचा …

पुढे वाचा

Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now