राजेभाऊ मोगल । Atul Save Vs Manoj Jarange Patil Imtiaz Jaleel
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील विद्यमान आमदार तथामंत्री अतुल सावे यांना या निवडणुकीमध्ये मराठा मतांचा चांगलाच दणका बसणार आहे. त्या दृष्टीने विरोधकांची तयारी देखील सुरू असल्याचे पाहायला मिळते.
माजी खासदार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. ते कामाला देखील लागले आहेत. अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचे साकडे त्यांनी घातले असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची ही भेट एका टीव्ही चॅनलच्या पत्रकाराच्या माध्यमातून झालेली असून त्यांनी पूर्व मध्ये तीन सभा मला द्याव्यात, अशी विनंती केली असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीमध्ये ही जागा भाजपसाठी आहे. तर महाविकास आघाडी कडून कुणाला सुटते त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत मात्र अतुल सावे हे जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रडारवर असणार आहेत. त्याला कारणही तसेच आहेत.
अतुल सावे हे बीड आणि जालना अशा दोन जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्याच काळामध्ये अंतरवाली सराटी या ठिकाणी जरांगे पाटलाचा आंदोलन सुरू असताना पोलिसांनी गोळीबार केला त्यात अनेक महिलांची डोके फुटली अन्य काही मंडळीही जखमी झाले आणि हे आंदोलन मोठं झालं त्यानंतर राज्यभर रॅली सभा या माध्यमातून वातावरण तापतं ठेवलं गेलं. पालकमंत्री म्हणून अतुल सावे यांनी ज्या पद्धतीने आंदोलकांशी चर्चा घडवून आणने गरजेचे होते, तशी चर्चा झाली नाही.
राज्यातील अनेक मंत्री जरांगे पाटलाच्या आंदोलन स्थळी रात्री-उप रात्री येत असताना त्यांच्यासोबत अतुल सावे अनेकदा गैरहजर असत, असा आरोप केला जातोय. दुसरं असं की एकीकडे मराठा आंदोलनाकडे फारसं लक्ष द्यायचं नाही आणि त्याच दरम्यान ओबीसींचे प्रतिआंदोलन सुरू झाल्यानंतर तिकडे सतत जायचं, पालकमंत्री असताना सर्वसामाजबद्दल पालकाची भूमिका असायला हवी होती. ती भूमिका निभावली जात नसल्याचा आरोप जरांगे पाटलांनी अनेकदा व्यक्त केला होता.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांची भूमिका सावे यांना अडचणीची ठरणार आहे. हीच बाब हेरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटलाची भेट घेतली असून जरांगे पाटलांचे मत आपल्या बाजूने कसं वळवता येईल, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यामुळे अतुल सावे यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण होणार असल्याचे बोललं जात आहे.
जरांगे यांच्या भेटीनंतर जलील म्हणाले, ‘भाजपची नीती लोकांना समजून आलीय, नरेंद्र मोदींनी येथील एका बड्या नेत्याला बोलावून मराठा आंदोलन दिल्लीत पोहचलं नाही पाहिजे, असे म्हटल होते. मात्र, आता ते सगळं एक्सपोज होत आहे’ असे जलील म्हणाले
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं ( Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ) बिगुल वाजलं आहे. राज्यातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 तारखेला निकाल लागणार असल्याचं आयोगाने सांगितले आहे.
मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचं काम फडणवीस यांनी केलं, देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील इच्छुक उमेदवारांच्या १७ ऑक्टोबर म्हणजे आज महत्वाची बैठक घेणार आहे. त्यांनतर २० ऑक्टोबरला ‘पाडायचं कीं लढायचं?’ ही मराठा समाजाची निर्णायक बैठक घेणार आहे.
Atul Save Vs Manoj Jarange Patil Imtiaz Jaleel
महत्वाच्या बातम्या
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले