🕒 1 min read
Ajit Pawar Vs Eknath Shinde | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं ( Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ) बिगुल वाजलं आहे. राज्यातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठीचं संपूर्ण वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 तारखेला निकाल लागणार असल्याचं आयोगाने सांगितले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule
- निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
- अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
- अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
- मतदान : 20 नोव्हेंबर 2024
- मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
दरम्यान, महायुतीत जागेवाटपावरून मोठा भूकंप होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देतांना भाजपने मोठा त्याग केल्याचे व्यक्तव्य अमित शहांनी केल्याने शिंदे गट बॅकफूटवर गेला आहे. त्यातून शिंदेंना थेट संदेश दिला आहे, यावेळी मित्र पक्षांना विधानसभेच्या जास्त जागा द्याव्या लागतील. विधानसभेसाठी भाजप १ ६ ० जागांवर लढणार आहे, यावेळी बहुमतांसाठी लागणारे संख्याबळ जमवताना अडचण होणार नाही याची काळजी भाजप घेताना दिसत आहे.
त्यामुळे उरलेल्या जागेवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना संधी मिळणार आहे. त्यात भाजप अजित पवारांना ( Ajit Pawar ) झुकते माप देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाला याचा थेट फटका बसणार आहे.
त्यामुळे शिंदे गटातील नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. यावर शिंदेंचे खासदार नरेश मस्के म्हणतात, आमच्यामध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही वाद नाही. आमचं जागावाटप पूर्ण झालं आहे. एकमेकांना समजून घेऊन ते झालं असल्याने कोणताही वाद नसल्याचे म्हस्के सांगतात.
Ajit Pawar Vs Eknath Shinde | Vidhan Sabha Election 2024
राजकीय अभ्यासक सांगतात, ” महाराष्ट्रात विधानसभेला २ ८ ८ जागा आहेत. त्यात भाजप १ ६ ० जागांवर लढणार आहे. राहिलेल्या १ २ ८ जागांवर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि इतर मित्र पक्ष असणार आहे. शिंदे गट विधानसभा निवडणुकीत १ ० ० विधानसभेच्या जागेसाठी आग्रही आहेत पण ते होणार नसल्याचं स्पष्ट चित्र आहे. शिंदेंना १ ० ० जागा दिल्या तर अजित पवार गट आणि इतर मित्र प्रश्नाचं काय करायचं? हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे अजित पवारांमुळे एकनाथ शिंदेंना फटका बसणार आहे.
Suvidha Portal App
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- आचारसंहिता लागताच एकनाथ शिंदेंना भाजपचा मोठा दणका? अमित शहांनी थेट सांगितले…!
- दोन पिढ्या झाल्या कोयता घासायला लावता; एकदा बेणं चांगला लावा; बजरंग सोनवणे यांचा पंकजा मुंडेंना टोला
- देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला, विधानसभेला त्यांची जिरवायचीच, सुपडासाफ करा – मनोज जरांगे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











