Share

देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला, विधानसभेला त्यांची जिरवायचीच, सुपडासाफ करा – मनोज जरांगे

Devendra Fadnavis Maratha Reservation Manoj Jarange Nana Patole

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange । मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचं काम फडणवीस यांनी केलं, देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांची जिरवायचीच, त्यांचा सुपडासाफ करायचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला. कुणाच्या जागा वाढवायच्या आणि कुणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी हे आवाहन केलं.

मराठ्यांचं आयुष्य बेचिराख करण्याचं काम फडणवीस यांनी केलं. फडणवीसांनी सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात केला. मराठ्यांना बेदखल करण्याचं काम फडणवीस यांनी केल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही यासाठीच फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केली. या मराठ्यांची पोरं आरक्षणासापासून, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित राहीले पाहिजेत अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस मराठ्यांसोबत वागले. सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात पण मराठा समाज एक ठेवायचा नाही, मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचं काम फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले. मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला.

Maratha Reservation Maharashtra Vidhan Sabha Election

मराठ्यांना फडणवीस यांची खुन्नस कळाली होती. आम्ही मराठ्यांना बाजूला ठेऊन सत्तेवर बसू असं देवेंद्र फडणवीसांनी ठरवलंय. देवेंद्र फडणवीस आम्हाला आरक्षण देतील असा आम्ही विश्वास ठेवला होता. शेवटी त्यांनी बरबटलेले विचार त्यांनी बाहेर आणलेच. मराठ्यांना बाजूला ठेवण्यासाठी फडणवीस यांनी डाव रचले. त्यांच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेऊन ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. इथे सर्व जातींचा प्रश्न आहे. हात जोडून सर्व समाजाला विनंती करतो, आपल्या समाजाला बळ द्यायचं काम करा. यावेळी मराठ्यांचे 100 टक्के मतदान झाले पाहिजे. मराठ्यांचे एकही मतदान घरी राहता कामा नये.

Devendra Fadnavis Vs Manoj Jarange 

महत्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Manoj Jarange Maratha Reservation Maharashtra Vidhan Sabha Election मराठ्यांची पोरं आरक्षणासापासून, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित राहीले पाहिजेत अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस मराठ्यांसोबत वागले

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now