🕒 1 min read
मुंबई: मराठा आरक्षणावरुन राज्यात सध्या धुसफूस सुरू आहे. त्यातच ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा असून, त्यांना जेलमध्ये टाका, अशी थेट मागणी जरांगे यांनी केली आहे. भुजबळ हे सरकार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मोठे नाहीत, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. या निर्णयाला विरोध करत, त्यात सुधारणा करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. भुजबळांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. “सरकारचा आणि मराठ्यांचा रोष आता कुठे कमी होत आहे. भुजबळांमुळे तो पुन्हा वाढू नये. देवेंद्र फडणवीस यांना भुजबळांमुळे डाग लागू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे,” असे जरांगे म्हणाले.
Manoj Jarange’s Attack on Chhagan Bhujbal
“जर भुजबळ इतके नाराज असतील, तर त्यांनी हिमालयात जावं. त्यांना इतकी प्रसिद्धी आणि सत्तेची मस्ती आली आहे की, ते सरकारचे नव्हे, तर फक्त स्वतःचे ऐकण्याचा आग्रह धरत आहेत. तुम्ही काय सगळ्यांचे बाप लागून गेलात का? तुम्हालाच खूप अक्कल आहे, सरकारला नाही का?” असा संतप्त सवाल जरांगे यांनी विचारला.
जरांगे यांनी भुजबळांवर हल्ला चढवताना, त्यांना “बिनडोक” असे संबोधले. ते म्हणाले, “या भुजबळांना सरकारनेच जेलमधून बाहेर आणले आणि आता तेच सरकारसाठी डोकेदुखी बनले आहेत. जर ते सरकारला धोकादायक ठरत असतील, तर त्यांना पुन्हा जेलमध्ये टाका, तेच बरं आहे.” भुजबळांमुळे संपूर्ण सरकारवर डाग लागू शकतो, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला. जरांगे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- डिजिटल युगातील व्यवसायाची गुरुकिल्ली: डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे?
- नवीन भाषा कशी शिकाल? प्रवासाच्या सुरुवातीपासून प्रगतीपर्यंतचे सोपे आणि प्रभावी टप्पे!
- आरोग्याची गुरुकिल्ली: निरोगी जीवनशैलीसाठी ‘या’ ६ सोप्या नियमांचे पालन करा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











