Share

विकासकामांमुळे अतुल सावेंच्या मतदारसंघाचे जिल्ह्यात वेगळे स्थान

Atul Save vs Imtiaz Jaleel Maharashtra Vidhan Sabha Election

Atul Save  | छत्रपती संभाजीनगर : तरुणांच्या हाताला काम, उद्योगाची मुहूर्तमेढ, रस्तेविकास, पाणी पुरवठा यासह अनेक कामांना प्राधान्य देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्व हा विधानसभा मतदारसंघ आपले स्थान टिकवून आहे. या मतदार संघातून महायुतीत भाजपाचे उमेदवार अतुल सावे दोनवेळा आमदार, दोनवेळा मंत्री राहिल्यानंतर आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मैदानात आहेत. प्रचारात मतदारांनी त्यांना दिलेला प्रतिसाद हा विजयाच्या दिशेनी घेऊन जाणारा आहे.

विकासकामांचे मॉडेल म्हणून पाहिले जाणाऱ्या पूर्व मतदार संघात प्रचारात त्यांनी मागील १० वर्षात गेलेल्या मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत आणि पुढे करावयाच्या विकासाबद्दल आपल्याकडे प्लॅन तयार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी पुढाकार घेतलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या माध्यमातून लवकरच शहराला पाणी मिळेल, मागील पाच वर्ष या कामासाठी मोठी मेहनत त्यांनी घेतली आहे. ही पाणीपुरवठाची योजना २०१९ मध्ये केवळ ५५ दिवसात मंजूर करून आणलेली आहे. अडीच वर्ष आघाडी सरकारच्या काळात या योजनेला ब्रेक लागला होता. मात्र, नंतर युती सरकार आल्यानंतर कामाला वेगाने सुरुवात झाली आणि आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. वेळेवर हवे तेवढे पाणी मिळाल्यानंतर शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.

सहकारमंत्री बहुजन कल्याण व गृहनिर्माणमंत्री पदावर काम करताना सामान्याचा विकास केला. आश्रम शाळा विकास, ९५ हजार विद्यार्थी शिक्षकांना टॅब वाटप, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, धनगर समाजाच्या उत्थानासाठी विविध योजना राबवण्यात आल्या. तसेच अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतून मराठा कुणबींच्या विकासासाठी काम केले.

या खात्याअंतर्गत विविध घटकांसाठी म्हाडा घरकुल योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवल्या. आपल्या कार्यकाळात आणलेल्या उद्योगाच्या सुमारे ५५ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे २५ हजार रोजगार निर्मिती होईल. येत्या तीन वर्षात शहराचा चेहरा बदललेला असेल. कौशल्य विकास शिबिर, युवकांना आत्मनिर्भर करणे, स्टार्टर कल्चर, शाळांचे संगणकीकरण, महिला सक्षमीकरण अशा विशेष उपक्रमावर येत्या काळात लक्ष दिले जाणार असल्याचे ते सांगतात.

केवळ पूर्व मतदारसंघच नव्हे तर शहरातील जवळपास अनेक प्रमुख रस्त्यांची कामे केली 90% अंतर्गत रस्ते पूर्ण आहेत. उर्वरित रस्ते देखील लवकरच पूर्ण होतील. मागील काही वर्षांपूर्वी शहरातील रस्त्याची दुरावास्ता झालेली होती. मुख्य रस्त्यासह महत्त्वाच्या रस्त्यासाठी सहाशे ८५ कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला.

घरे ‘फ्रीहोल्ड’ने २१ हजार मालधारकांना मिळाला लाभ

सिडको मधील १३ योजनांमध्ये बांधलेली घरे आजही नागरिकांच्या मालकीची नाही. या गोष्टीचे वाईट वाटायचे. त्यामुळे गेल्या महिन्यात ही घरे फ्रीहोड करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. २१ हजार मालमत्ता धारकांना त्याचा फायदा होणार आहे. हे काम नाममात्र दरांमध्ये करून नागरिकांना मालकी हक्क मिळवुन दिला आहे. पूर्व मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सिडकोच्या वसाहती आहेत. त्यामुळे या निर्णयाचा लाभ नागरिकांना मिळायला हवा, यासाठी मी प्रयत्न केले. त्याबद्दल सर्वांनी आभार मानले. अशी मंडळी आपल्या सोबत असल्याचे ते सांगतात. तसेच शहराला उद्योगांचे केंद्र बनवण्यासाठी महायुतीला साथ देण्याचे आवाहन ते करीत आहेत.

Atul Save Maharashtra Vidhan Sabha Election 2024

महत्वाच्या बातम्या

Atul Save  | छत्रपती संभाजीनगर : तरुणांच्या हाताला काम, उद्योगाची मुहूर्तमेढ, रस्तेविकास, पाणी पुरवठा यासह अनेक कामांना प्राधान्य देत छत्रपती …

पुढे वाचा

Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now