अजितदादांना ‘बटेंगे तो कटेंगे’ मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं

Balasaheb Thorat ।  Maharashtra Assembly Election 2024 ।  उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ‘एक है तो सेफ है’, असे म्हटले होते. या घोषणेला अजित पवार यांनी (Ajit Pawar)  विरोध केल्याचे दिसून आले. आता यावरून … Read more

Published On: 

Balasaheb Thorat ।  Maharashtra Assembly Election 2024 ।  उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ‘एक है तो सेफ है’, असे म्हटले होते.

या घोषणेला अजित पवार यांनी (Ajit Pawar)  विरोध केल्याचे दिसून आले. आता यावरून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिलाय.

थोरात म्हणाले,”लोकशाहीत विकासाची चर्चा झाली पाहिजे. मात्र विष पेरणारी चर्चा केली जात आहे. सर्वांनी बटेंगे तो कटेंगेचा विरोध केला पाहिजे. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. त्यावर हे बोलायला तयार नाहीत, अशा काहीतरी घोषणा दिल्या तर आपोआप मते पडतील असे त्यांना वाटते. अजित पवारांना हे मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावे. फक्त विरोध करून गप्प बसणे योग्य नाही, असा सल्ला त्यांनी अजित पवारांना दिलाय.

व्होट जिहाद बाबत विचारले असता, बाळासाहेब थोरात म्हणाले की, व्होट जिहाद हा नवा शब्द भाजपने काढला. कांदा उत्पादकांनी आम्हाला मते दिली तर कांदा जिहाद बोलणार का? शेतकऱ्यांनी मते दिली तर त्याला शेतकरी जिहाद म्हणायचे का? भेद निर्माण करणे ही भाजपची पद्धत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी या विषयावर ते बोलू शकत नाही. दिशाहीन करण्यासाठी व्होट जिहादसारखे मुद्दे काढले जात आहेत. हा सगळा विष पेरण्याचा कार्यक्रम आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली आहे.

Balasaheb Thorat Maharashtra Assembly Election 2024

महत्वाच्या बातम्या

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही