Abdul Sattar Vs Raosaheb Danve | राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराचा धडाका सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आहे.
दरम्यान अब्दुल सत्तार यांनी “मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो”, असं विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचे लोक खडखड करत आहेत, त्यांच्यासाठी मी म्हणालो की आम्ही मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो, कारण मी गुवाहाटीला गेलो, बिर्याणी खाल्ली आणि मुख्यमंत्री बदलला. एका शेतकऱ्याच्या मुलाला मी मुख्यमंत्री केलं, मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे.
मी हिंदुत्ववादी असलेल्या एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं, एमआयएमचा मुख्यमंत्री केला नाही. आम्ही बंड केलं नसतं तर भाजपचे लोक सत्तेत आले असते का? आणि पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच होणार असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी रावसाबेह दानवे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत मला मदत केली असती तर मला प्रचार करण्याची गरज पडली नसती. राजकारणात लपून छपून काम करणाऱ्या लोकांचे काय हाल होतात हे त्यांनी लोकसभेमध्ये पाहिलं आहे.
मी लोकांकडे त्यांच्यासाठी मतं मागितली मात्र लोकांनी त्यांना मतं दिली नाहीत, त्याचं खापर ते माझ्या डोक्यावर फोडत आहेत, आतापर्यंत लोकांनी धक्के आणि लाथा सहन केल्या, मात्र हे खूप महागात पडतं एखाद्याला धक्का मारला तर लोक परत बुक्का मारतात हे मी त्यांना समजून सांगितलं, असा टोला यावेळी सत्तार यांनी लगावला आहे.
Eknath Shinde Abdul Sattar Raosaheb Danve
महत्वाच्या बातम्या