Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) यांनी पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता याप्रकरणी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे.
काल रात्री वाल्मिक कराडने वंजारी युवकांना सांगितले होते की उद्या पुण्यात सेरेंडर करायचं आहे.पुण्यातील मराठा समाज समोर आला तर त्यांच्याशी खेटायला मोठ्या संख्येने सीआयडी ऑफिस पुणे आसपास उपस्थित रहा असा संदेश परळी बीड व पुण्याच्या आसपास असणाऱ्या वंजारी युवकांना गेले. तसेच त्यांना आणण्यासाठी गाड्या पुरवल्या आणि काल परळीहून आलेल्यांची रात्री सोय केली, असे ट्विट सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, सीआयडी आणि पोलिसांना हे सगळं माहीत नसेल का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, भैया पाटील यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही. आरोपींवर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. आम्ही गुंडांचं राज्य चालू देणार नाही. याचा तपास अतिशय गतिशील केला असल्याने त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत असून जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंत पोलीस कारवाई करतील,” असे मोठे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
“वाल्मीक कराड शरण येईपर्यंत, झोपेचे सोंग घेणारे गृहखाते; खरचं संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकेल का? गुन्हेगाराला अटक करण्यात अपयशी ठरलेले गृहखाते, आरोपींच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात अपयशी तर ठरणार नाही ना?” असे सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
तसेच, “वाल्मिक कराड याचं surrender होणं हे सामान्य लोकांनी केलेल्या उठावाचं यश असून आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. तर तपास करताना या गुन्ह्यात कोणतेही कच्चे दुवे राहणार नाहीत याचीही पोलिसांनी काळजी घ्यावी. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा,” अशी विनंती आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.
Walmik Karad Arrest in Pune
“वाल्मिक कराड आज पुणे येथे पोलिसांना शरण आला आहे. तब्बल 22 दिवस तो पोलिसांना सापडत नव्हता, हेच संशयास्पद आहे. पोलिस खात्याने पाठीचा कणा दाखवून बीडसह महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुंडगिरीचा बंदोबस्त करायला पाहिजे. दहशत कायमची संपली तर न्याय झाला असे म्हणता येईल, नाहीतर ही शरणागती तपासाची नौटंकी ठरेल,” असे वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :