Share

Walmik Karad । सुरेश धस यांच्या वक्तव्याने खळबळ, धनंजय मुंडेंना भेटल्यावर वाल्मिक कराड शरण?

by MHD
Walmik Karad | Suresh Dhas statement on Walmik karad Arrest

Walmik Karad । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी आता सीआयडीला मोठे यश आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल तीन आठवड्यानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी सीआयडीला शरण येण्याचा निर्णय घेतला आहे. (Walmik Karad arrested)

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत असताना यावर आता पत्रकारांशी बोलत असताना मागील काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर वाल्मिक कराड शरण आले का? याच धनंजय मुंडेच (Dhananjay Munde) उत्तर देऊ शकतील. इतकेच नाही तर त्यांच्या मंत्रिपदाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारच घेऊ शकतील,” असेही मत सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे.

Suresh Dhas Statement on Walmik Karad Arrest

तसेच याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “वाल्मिक कराड यांना अटक झाली हे चांगलं काम झालं. ते पोलिसांना शरण गेले ही चांगली बाब आहे. त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक होणं गरजेचे होते. पारदर्शक तपास करणे हे CID चे काम आहे. जर ते गुन्ह्यात आरोपी नसतील तर त्यांना इतके दिवस यावर मत देण्यास उशीर का झाला? तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर तेव्हाच शरण यायचं होत,” अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Walmik Karad has surrendered to the CID police. Now BJP MLA Suresh Dhas has reacted to this.

Maharashtra Marathi News Politics