🕒 1 min read
Walmik Karad । संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये सीआयडीच्या 9 टीम कार्यरत आहे. या प्रकरणी सर्व आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले असून संपत्ती जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली. अशातच आता या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. काल (30 डिसेंबर 2024) रोजी ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. ‘महाराष्ट्र देशा’ च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.
आरोपी वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी CID प्रयत्न करत होती. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह होता. अशातच नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरलमध्ये देखील वाल्मिक कराडने काहीजणांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तरीदेखील कराडकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. अशातच आता CID ला वाल्मिक कराडला पकडण्यात मोठं यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- देवेंद्र फडणवीस तुम्ही दाऊदला फरफटत आणणार होते, मग वाल्या कराडला आणायला काय हरकत? – जितेंद्र आव्हाड
- क्रिकेटविश्वात खळबळ! हिटमॅन आणि किंग कोहलीच्या निवृत्तीबद्दल Sunil Gavaskar स्पष्टच बोलले..
- Garlic benefits । काय सांगता! अशा प्रकारे करा लसणाच्या पाकळ्यांचा वापर, झटक्यात कमी होईल कोलेस्ट्रॉल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











