Share

देवेंद्र फडणवीस तुम्ही दाऊदला फरफटत आणणार होते, मग वाल्या कराडला आणायला काय हरकत? – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad VS Walmik Karad & Devendra Fadnavis

Jitendra Awhad | तुम्ही दाऊदला फरफटत अणणार होते. मग वाल्या कराडला ( वाल्मिक कराड ) आणायला काय हरकत आहे? असे म्हणत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देवेंद्र फडणवीसांनावर हल्लाबोल केला. मी आका काका म्हणणारा नाही, मी थेट मुंडे यांचे नाव घेणार, असे आव्हाड म्हणाले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या प्रकरणात आरोपी आहे, मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आव्हाड म्हणाले. लोकांची मेमरी शॉर्ट आहे. लोकं विसरून जातील. याची ते वाट फडणवीस पाहत आहेत असेही आव्हाड म्हणाले. 302 मध्ये वाल्मिक कराड यांचं नाव नाही. मोक्का लावू असं सभागृहात सांगितलं होतं मात्र अद्याप काहीच हालचाली नसल्याचे आव्हाड म्हणाले.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी 302 चा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यामध्ये वाल्मिक कराडचे नाव नसल्याचे आव्हाड म्हणाले. सभागृहात तुम्ही सांगून देखील या प्रकरणात अद्याप काही कारवाई नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. अजित पवार यांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतली नाही असेही आव्हाड म्हणाले.

उलट सभागृहात अजित पवार यांनी सुरेश धस यांना डोळा डोळा म्हणत खुणवत होते असे आव्हाड म्हणाले. त्यांचा उद्देश काय होता हे मला माहित नाही असे आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad VS Walmik Karad & Devendra Fadnavis

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केली. त्यासह, वाल्मिक कराडच या घटनेतील मुख्य सुत्रधार असून त्यालाही अटक करण्याची मागणी आमदार, खासदार व स्थानिक नेते करताना दिसत आहेत. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारेन, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्‍यांना इशारा दिला होता. तर, धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचंही नेत्यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

Jitendra Awhad VS Walmik Karad & Devendra Fadnavis | संतोष देशमुख हत्याप्रकरणी 302 चा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यामध्ये वाल्मिक कराडचे नाव नसल्याचे आव्हाड म्हणाले. सभागृहात तुम्ही सांगून देखील या प्रकरणात अद्याप काही कारवाई नाही

Politics Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment