Share

Garlic benefits । काय सांगता! अशा प्रकारे करा लसणाच्या पाकळ्यांचा वापर, झटक्यात कमी होईल कोलेस्ट्रॉल

by MHD
Garlic benefits | You can now consume garlic to reduce the problem of cholesterol in the body. Garlic is also very beneficial for other diseases.

Garlic benefits । धावपळीच्या काळात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेकांना आजारांचा सामना करावा लागतो. अनेकदा हेच आजार जीवघेणेदेखील ठरू शकतात. पण काही घरगुती उपायांनी तुम्ही या आजारांपासून सुटका मिळवू शकता.

प्रत्येक स्वयंपाकघरात लसूण आढळतोच. लसणाचा वापर फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील केला जातो. कारण यामध्ये औषधी गुणधर्म आढळतात. लसणाच्या सेवनामुळे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव होतो.अनेकांना लसणाचे आरोग्यदायी फायदे माहिती नसतात. चला तर मग जाणून घेऊयात लसणाचे फायदे.

Garlic Help Improve Bone Health

हाडे होतात मजबूत

लसणामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आढळते. त्यामुळे जर तुम्ही नियमित लसणाचे सेवन केले तर हाडे मजबूत होतात. तसेच सांधेदुखीपासून देखील कायमचा आराम मिळतो.

Garlic Reduce The Cholesterol

कोलेस्ट्रॉल होते कमी

अलीकडच्या काळात अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार तुम्हाला जर यूरिक ॲसिड आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल तर झोपण्यापूर्वी लसूण पाण्यात भिजवून ठेवून रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्यांचे सेवन केले पाहिजे. यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहील. तसेच लसणाच्या तीन ते चार पाकळ्या बारीक करून त्यात एक चमचा मध टाका. सकाळी उपाशीपोटी या पेस्ट सेवन करा. यामुळे देखील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

Garlic Beneficial for boosting immunity

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर

लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये लसूण खाल्ला तर व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्ग कमी होतो.

Garlic will solve the blockage problem

ब्लॉकेजची समस्या होते दूर

लसणाच्या तीन ते चार पाकळ्या बारीक करून त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून त्याच सेवन करा. असे केल्याने नसांमध्ये जमा असणारे विषारी तत्वही बाहेर पडून ब्लॉकेजची समस्याही दूर होते.

महत्त्वाच्या बातम्या : 

Garlic benefits | You can now consume garlic to reduce the problem of cholesterol in the body. Garlic is also very beneficial for other diseases.

Maharashtra Health Marathi News

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment