Share

“बंदुकांचे परवाने कुणाच्या कार्यकाळात वाटले गेले?”; Suresh Dhas यांचा मोठा खुलासा

"बंदुकांचे परवाने कुणाच्या कार्यकाळात वाटले गेले?"; Suresh Dhas यांचा मोठा खुलासा

Suresh Dhas | गेल्या काही दिवसांपासून बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे.

अशातच भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले , “मी आधीच सांगितले की,बकरी की माँ कब तक दुवा मागेगी?, दुआँ फार काळ चालत नसती. दुआँ अर्ध्यातच सुटणार आहे. आका आणि त्यांचे आका यांच्यात द्वंद चालू असल्याचे चित्र आहे.”

पुढे ते म्हणाले, “कुठल्या पोलीस अधीक्षकांच्या कालावधीत बंदुकांचे परवाने गेले आहेत अशा अधिकाऱ्याचं नाव समजलं पाहिजे. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस निरीक्षक असे परवाने देत असतील तर महाराष्ट्राचा बिहार होतो आहेच. कुणीही परवाने काढत आहे, लग्नात बंदुका दाखवत आहेत. चौकात उभा राहिला की ठाँय करतोय. हे ठाँय ठाँय संपवलं पाहिजे अशी विनंती मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.”

बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या बंदुकीच्या परवान्यासंदर्भात धस यांनी चर्चा करुन हे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावर, तपास करुन 1 हजार परवाने रद्द करण्याचं आश्वासनही धस यांना देण्यात आल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या बंदुकीच्या परवान्यासंदर्भात सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी चर्चा करुन हे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावर, तपास करुन 1 हजार परवाने रद्द करण्याचं आश्वासनही धस यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now