Share

सई ताम्हणकर भडकली! प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ कान्स लूकवर थेटच बोलली; म्हणाली ‘काय परिधान करावं आणि……..’

कान्स फेस्टिव्हलमधील प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरने मौन सोडले असून, ‘कोणी काय घालावं हा त्यांचा प्रश्न आहे’ असे सडेतोड उत्तर ट्रोलर्सला दिले आहे.

Published On: 

Saie Tamhankar on Prajakta: कान्स लूकवरून भडकली!

सोशल मीडियावर कधी कोणाला ट्रोल केलं जाईल आणि कधी कोणाचं कौतुक होईल, याचा काही नेम नाही. याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. निमित्त ठरलंय ते नुकताच पार पडलेला कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बहुचर्चित मराठमोळा लूक!

कान्सच्या रेड कार्पेटवर प्राजक्ताने मराठमोळा साज केला खरा, पण काही नेटकऱ्यांना तो खटकला. तिच्या कपड्यांवरून थेट अंगप्रदर्शनाचा आरोप करत अनेकांनी तिला ट्रोल केलं. आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) हिने मौन सोडलं असून, ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलंय.

Saie Tamhankar on Prajakta

‘महाराष्ट्र टाईम्स’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सईने Prajakta Mali Cannes Look वर स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. प्राजक्ताचं भरभरून कौतुक करताना सई म्हणाली, “प्राजक्ताने ज्या आत्मविश्वासाने आणि ग्रेसने रेड कार्पेटवर स्वतःला कॅरी केलं, ते मला खूप आवडलं.”

ट्रोलर्सचा समाचार घेत सईने पुढे एक मोठी आणि रोखठोक भूमिका मांडली. ती म्हणाली, “काही जणांना ते झोंबलं जरी असलं, तरी ते एका अर्थी चांगलंच झालं. कारण याचा अर्थ लोकांचं तिच्याकडे लक्ष होतं. कोणी काय परिधान करावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.” लोक काही ना काही बोलणारच आहेत, त्यापेक्षा आपण ते क्षण साजरे का करू नयेत, असा थेट सवालच सईने उपस्थित केलाय.

दरम्यान, स्वतः कान्सला जाण्याबद्दल सईने तिची इच्छा व्यक्त केली. भविष्यात कधी कान्सला जायची संधी मिळाली, तर स्वतःच्या एखाद्या सिनेमाच्या सादरीकरणासाठी जायला आवडेल, असं सई म्हणाली. लवकरच ती ‘तुंबाडची मंजुळा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तूर्तास, सईच्या या प्रतिक्रियेमुळे मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही