आजकालची लग्नं म्हणजे खरंच एखादी परीकथा असते का? की त्यामागे काही वेगळंच वास्तव दडलंय? याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. निमित्त ठरलंय ते अभिनेता राकेश बापट याची पूर्व पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने केलेली एक अत्यंत परखड आणि थेट इन्स्टाग्राम पोस्ट.
सध्या मॉडेल ट्विशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर Ridhi Dogra viral post सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली असून, तिने आजकालच्या तरुणाईला आणि विशेषतः मुलींना वास्तवाचं भान करून देण्याचा प्रयत्न केलाय.
Ridhi Dogra Post
रिद्धीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टच लिहिलंय की, “मुलींनो, लग्न म्हणजे कोणतीही परीकथा (Fairytale) नाही, त्यामुळे तशी अपेक्षा करणं आता तरी थांबवा.” तिने पुढे सांगितलंय की तुमचा बॉयफ्रेंड कुणी ‘मिस्टर परफेक्ट’ नाहीये. तोही एक सामान्य माणूस आहे, जो या बदलत्या जगात स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय.
कारण, आजवर समाजाने पुरुषांकडून वेगळ्याच अपेक्षा ठेवल्या आहेत, हे भान आपण ठेवायला हवं. मुलींना आत्मनिर्भर होण्याचा थेट सल्ला देताना ती म्हणाली, “कायद्याने आणि समाजाने मुलींना आता सशक्त बनवलं आहे. त्यामुळे केवळ आयुष्य काढण्यासाठी मुलींना लग्नाची गरज उरलेली नाही.
स्वतःला शिक्षित करा आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढायला शिका.” प्रेमासाठी आणि आदरासाठी लग्न करा, कुणावर अवलंबून राहण्यासाठी नाही, असा मोलाचा सल्ला तिने दिला आहे. एवढंच नाही तर, नवरा-बायकोच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपावरही तिने कडक शब्दात ताशेरे ओढलेत.
“जर वैवाहिक आयुष्यात तुम्हाला तुमचे निर्णय घेण्यासाठी आई-वडील किंवा तिसऱ्या व्यक्तीची गरज भासत असेल, तर ते लग्न तुमचं नाही, संपूर्ण गर्दीचं आहे,” असा सणसणीत टोलाही तिने लगावला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- काव्या मारनचा कृणालच्या गोलंदाजीवर संताप; गोलंदाजी पाहून काव्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह
- सोने-चांदीच्या दराला अचानक ब्रेक; ‘त्या’ जागतिक घडामोडींमुळे सराफा बाजारात मोठी खळबळ!
- कान्समध्ये आराध्याने ऐश्वर्याला टाकलं मागे; ‘त्या’ एका लुकने इंटरनेटवर उडवली खळबळ!
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









