Sunil Gavaskar । मागील काही दिवसांपासून भारतीय संघ चांगलाच चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy) मेलबर्नच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.
महत्त्वाची बाब म्हणजे संघाच्या पराभवाचे खापर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहलीवर (Virat Kohali) फोडले जात आहे. या सामन्यांनंतर दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चांना सोशल मीडियावर चांगलेच उधाण आले आहे. अशातच आता भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्ती बाबत मोठं विधान केलं आहे.
“या सीरिजनंतर मी रोहित शर्माला टेस्ट क्रिकेटमध्ये पाहत नाही. रोहित आणि विराटला न्यूझीलंड विरुद्ध मालिकेत अपेक्षित धावांचा टप्पा गाठता आला नाहीत. या देखील सीरिजमध्ये त्यांना धावा करता आल्या नाहीत. कोहलीने एक शतक जरुर झळकवल आहे. पण त्या मॅचमध्ये कोहली फलंदाजीला आला, त्यावेळी संघ चांगल्या स्थितीत होता,” असं वक्तव्य गावस्कर यांनी केले आहे.
जर रोहित शर्माने चांगल्या धावा केल्या नाही तर सिडनी टेस्ट रोहितचा शेवटचा कसोटी सामना असेल असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचाण्याची शक्यता कमी झाली आहे. WTC चा पुढचा सीजन (2025-27) जून इंग्लंड दौऱ्यापासून सुरु असून त्यावेळी 2027 साठी तुम्हाला नवीन चेहऱ्यांची अपेक्षा असेल,” असंही गावस्कर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या खेळाडूंच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :