Share

Walmik Karad Surrender to CID । मग तेव्हाच शरण का नाही गेले? खासदार सोनावणेंचा सवाल

by MHD
Walmik Karad Surrender to CID । मग तेव्हाच शरण का नाही गेले? खासदार सोनावणेंचा सवाल

Walmik Karad Surrender to CID । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. यावर आता खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“वाल्मिक कराडला अटक झाली हे चांगलं काम झालं. ते पोलिसांना शरण गेले ही चांगली बाब आहे. त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक होणं गरजेचे होते. पारदर्शक तपास करणे हे CID चे काम आहे. जर ते गुन्ह्यात आरोपी नसतील तर त्यांना इतके दिवस यावर मत देण्यास उशीर का झाला? तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर तेव्हाच शरण यायचं होत,” अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली आहे.

तसेच वाल्मिक कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख (Vaibhav Deshmukh) हिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या वडिलांच्या हत्येला 22 दिवस झाले आहेत. अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी जे तीन आरोपी फरार आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय द्या. माझ्या वडिलांची हत्या करणाऱ्यांवर कारवाई करा. वडिल पुन्हा आणू शकत नाही. पण त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये. आमच्या सगळ्यांच एकच मत आहे, माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे.

Bajrang Sonawane’s reaction to Walmik Karad’s arrest

संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. काल (30 डिसेंबर 2024) रोजी ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. ‘महाराष्ट्र देशा’ च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Walmik Karad Surrender to CID. Massajog sarpanch Santosh Deshmukh’s murder case has created a lot of excitement throughout Maharashtra. MP Bajrang Sonawane has reacted in this matter.

Marathi News Crime Maharashtra Politics Pune

Leave a Comment