Share

Vaibhavi Deshmukh । वाल्मिक कराडला अटक होताच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या प्रतिक्रियेने खळबळ, म्हणाली….

by MHD
Vaibhavi Deshmukh | Santosh Deshmukh's daughter reacts to Walmik Karad's arrest

Vaibhavi Deshmukh । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. (Valmik Karad arrested by CID)

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी असून त्या गुन्ह्यात तो शरण गेल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. पोलीस यंत्रणा काम करतेय मग एवढा वेळ का लागत आहे? गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करत आहे? आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार? असा सवाल वैभवी देशमुखने उपस्थित केले आहेत.

“माझ्या वडिलांच्या हत्येला 22 दिवस झाले आहेत. अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी जे तीन आरोपी फरार आहेत, त्यांना लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय द्या. माझ्या वडिलांची हत्या करणाऱ्यांवर कारवाई करा. वडिल पुन्हा आणू शकत नाही. पण त्यांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये. आमच्या सगळ्यांच एकच मत आहे, माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी वैभवी देशमुखने केली आहे.

Santosh Deshmukh’s daughter Vaibhavi Deshmukh reacts to Walmik Karad CID arrest At Pune

संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. काल (30 डिसेंबर 2024) रोजी ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. ‘महाराष्ट्र देशा’ च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Santosh Deshmukh’s daughter Vaibhavi Deshmukh reacts to Walmik Karad’s CID arrest At Pune

Crime Maharashtra Marathi News Pune

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment