Devendra Fadnavis । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराड यांनी पुण्यात सीआयडीकडे शरण येण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी मोठे प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही. आरोपींवर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. आम्ही गुंडांचं राज्य चालू देणार नाही. याचा तपास अतिशय गतिशील केला असल्याने त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे.
पोलिसांचा तपास सुरु आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत असून जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंत पोलीस कारवाई करतील,” असे मोठे विधान त्यांनी केले आहे.
आरोपी वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी CID प्रयत्न करत होती. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच अॅक्टिव्ह होता. अशातच नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरलमध्ये देखील वाल्मिक कराडने काहीजणांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तरीदेखील कराडकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. अशातच आता CID ला वाल्मिक कराडला पकडण्यात मोठं यश आले आहे.
Devendra Fadnavis statement on Santosh Deshmukh murder case
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. काल (30 डिसेंबर 2024) रोजी ‘महाराष्ट्र देशा’ वेबपोर्टलने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. ‘महाराष्ट्र देशा’ च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे.