Share

अभिजीत दिपकेंच्या ‘संसद चलो’ मोर्चाला पोलिसांचा ब्रेक? दिल्लीत कलम १६३ लागू, अन्यथा थेट कारवाईचा इशारा

नीट पेपरफुटीविरोधात पुकारलेल्या ‘संसद चलो’ मोर्चाला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार. नवी दिल्लीत कलम १६३ लागू, नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा.

Published On: 

Abhijeet Dipke and protesters at Jantar Mantar Delhi regarding NEET issue

दिल्ली– संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर दिल्लीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जंतरमंतरवर गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं आंदोलन आता थेट संसदेवर धडकणार का? हा प्रश्न निर्माण झालाय.

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी २० जुलै रोजी ‘संसद चलो’ मोर्चाची हाक दिली होती. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी जमाव जमवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला कोणतीही परवानगी दिली नसून, थेट कारवाईचा गंभीर इशारा दिला आहे.

Abhijeet Dipke ला परवानगी नाहीच, संसदेबाहेर कडेकोट बंदोबस्त

सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानीत आणि विशेषतः संसदेच्या आजूबाजूला कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय की, दिपके यांच्या या मोर्चासाठी कोणतीही अधिकृत परवानगी मागण्यात आलेली नाही आणि ती दिलेलीही नाही.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नवी दिल्ली परिसरात आता भारतीय न्याय संहितेचं (BNS) कलम १६३ (पूर्वीचे कलम १४४) लागू करण्यात आलं आहे. या नव्या आदेशानुसार, जंतरमंतरवरील अधिकृत जागा वगळता इतरत्र कुठेही पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

या नियमांचं उल्लंघन करून मोर्चात सहभागी होणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जे लोक बेकायदेशीर जमावाचा हिस्सा बनतील, त्यांच्यावर बीएनएस कलम २२३ आणि इतर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, असं पोलिसांनी बजावलंय. त्यामुळे आता अभिजीत दिपके आणि त्यांचे समर्थक माघार घेणार की मोर्चावर ठाम राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही