छत्रपती संभाजीनगर- राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण (NCP Merger) होणार, अशा चर्चांनी सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आमदार रवी राणा यांनी तर चक्क सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या जबाबदाऱ्याही वाटून दिल्या होत्या. पण खरंच पडद्यामागे असं काही घडणार आहे का?
या सर्व चर्चांवर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिल्लीत विलीनीकरणाची बैठक होणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावत, ‘दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नाहीत,’ असा स्पष्ट दावा शिरसाट यांनी केलाय. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र का येणार नाहीत?
एकत्र येण्यासाठी ज्या काही अटी आणि शर्थी आहेत, त्या दोन्ही गटांना मान्य नसल्याचं शिरसाट म्हणाले. वेगवेगळे विलीन झाले तर होऊ शकतात, मात्र एकत्रितपणे हे दोन गट विलीन होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणावरही त्यांनी भाष्य केलं. हे खासदार शिवसेनेतच आले आहेत, त्यांनी पक्ष बदललेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. “एकनाथ शिंदेंनी आधीच सांगितलंय की स्वतःच्या पक्षाची रक्षा करा,” असा चिमटाही त्यांनी काढला.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाच्या पाहणीवेळी शिरसाट यांचा मोठा संताप पाहायला मिळाला. गोरगरीब रुग्णांसाठी असलेल्या या रुग्णालयात १४ कोटी रुपये खर्च करूनही कोणतीच सुधारणा न दिसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरलं. “एका क्षणाचाही विलंब न लावता दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करा,” असे कडक आदेश त्यांनी अभियंत्यांना दिले आहेत. तसेच हा भ्रष्टाचाराचा विषय आपण आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोरही मांडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अल निनोचा धोका खरंच टळलाय का? हवामान तज्ज्ञांचा यंदाच्या पावसाबाबत सर्वात मोठा अंदाज
- उद्धव ठाकरेंवर थेट गुन्हा दाखल करा! मुंबईत पुकारलेल्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप
- ‘कोणाला सीता बनवलात?’; ‘रामायणम्’ सिनेमात साई पल्लवीच्या कास्टिंगवरून दिग्गज अभिनेता भडकला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












