Walmik Karad । महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार पाहता या प्रकरणाचा तपास विद्यमान न्यायमूर्ती यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे.
वाल्मिक कराड शरण येतो पण त्याला पकडू शकत नाही ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब
अतुल लोंढे म्हणाले की, राज्यातील पोलीस दल व सीआयडी आजही सक्षम आहेत पण ते राजकीय दबावाखाली असल्याने त्यांचे मनोबल कमजोर होते. आरोपी शरण येतो पण त्याला पकडू शकत नाही ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? नागपूरमध्ये ७ दिवसात ७ खून झाले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व मीडियातून स्वतःचे कौतक थांबवावे असेही अतुल लोंढे म्हणाले.
कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा
बीड प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. बीड मधील गुन्हेगारीला सत्ताधारी पक्षाचे आमदार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ म्हणतात. बीडमधील गुन्हेगारीला आळा घालून राजकीय आशिर्वादाने फोफावलेली ही विषवल्ली कायमची नष्ट करा व यामागे ज्यांचा हात आहे त्यांनाही अद्दल घडवावी.
Walmik Karad Surrender CID at pune
परळीतून पुण्याला Walmik Karad च्या समर्थनार्थ गाड्या गेल्या. त्यांच्या हजारो लोकांना माहित होत की Walmik Karad कुठं आहेत, कधी सरेंडर होणार. पण पोलिसांना, CID ला माहीत नसावं का? असा प्रश्न लोक विचारात आहे.
वाल्मिक कराड इतके दिवस कुठे होते? हे खरंतर सीआयडीचे अपयश
प्रकाश सोळंके म्हणाले की, वाल्मिक कराडने शरणागती पत्करली, हे खरंतर सीआयडीचे अपयश आहे. सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकली नाही, कराड यांनी आत्मसमर्पण केलं. परंतु, अजूनही खुनाच्या गुन्ह्यातील तीन प्रमुख आरोपी मोकाट आहेत. त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही.
वाल्मिक कराड इतके दिवस कुठे होते? पोलिसांपासून ते अशा पद्धतीने लपून कसे राहू शकले? याचाही तपास सीआयडीने करावा. वाल्मिक कराड शरण आले नसते तर सीआयडीने अजूनही त्यांना किती दिवस पकडले नसते हा देखील चर्चेचा मुद्दा आहे. इथून पुढे तपास निःपक्षपातीपणे व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबरला खून करण्यात आला. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 20 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या (Pune CID) कार्यालयात शरण आला.
महत्वाच्या बातम्या