Devendra Fadnavis Vs Ajit Pawar Nawab Malik | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार18 नोव्हेंबरला संध्याकाळी संपेल. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हवेची दिशा बदलली आहे. मागच्या सहा महिन्यात आम्ही ज्या पद्धतीने काम केलं, त्यामुळे लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. लोकसभेला महाविकास आघाडीने फेक नरेटिवद्वारे विचार प्रदूषित केले. आम्ही आता ते खोडून काढलय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“लोकसभा निवडणुकीत आमचा दोन कारणांमुळे पराभव झाला. एक म्हणजे संविधान बदलणार आणि दुसरं म्हणजे आरक्षण काढणार. हा प्रचार तळागाळात झाला. ही मी माझी चूक मानतो. ज्या वेगाने हे नरेटिव पसरलं, ते आम्ही रोखू शकलो नाही.
‘बंटेंगे तो कटेंगे’ यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अजित पवार, अशोक चव्हाण वेगळ्या विचारधारेतून आले आहेत. ते सूडो सेकुलरिज्म त्यांच्या विचारातून बाहेर येतं. योगीजी जेव्हा बोलतायत, बंटेंगे तो कटेंगे याचा अर्थ त्यांना समजत नाहीय. पण आम्ही लवकरच ती गोष्ट त्यांना पटवून देऊ”
अजित पवार यांच्या सोबत नवाब मलिक यांच्यावरून 100 टक्के मतभेद आहेत. नवाब मलिक यांचं काम आम्ही करणार नाही. नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका असं सांगितलं होतं, तिथे आम्ही शिवसेनेला तिकीट दिलय, त्यांचं काम आम्ही करतोय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis Vs Ajit Pawar Nawab Malik
महत्वाच्या बातम्या