Nawab Malik vs Devendra Fadnavis । अजित पवार नेते नवाब मलिक देवेंद्र फडणवीसांविरोधात दंड थोपटले आहे. फडणवीसांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुणी कितीही मोठं असू द्या किंवा छोटी असू द्या. देवेंद्र पण असू द्या मी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. जर या लोकांनी माफी मागितली नाही तर मी यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. सिव्हिल आणि डिफेन्सेस केस टाकणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘फडणवीस यांचा पाठिंबा नबाब मलिक मागतोय का? आम्ही मागत नाही, आम्ही मागणारही नाही. मागणारा नवाब नाही, आम्ही देणारे आहोत. नबाब मलिक कोणाला घाबरत नाही.
माझ्या बाबतीत गैरसमज निर्माण करतात, दाऊदशी माझं नाव जोडतात. काही लोक आतंकवादी बोलतोय काही लोक देशद्रोही बोलतायेत. या सगळ्यांना नोटीस पाठवणार, सगळ्यांवर क्रिमिनल केस टाकणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
भाजपवाल्यांनो, ताकात लावून बघा… तुमची हिंमत असेल तर माझी जागा पाडून दाखवा. मी फटिचर माणूस आहे. कोणीही माझ्या नादी लागू नका, असा इशारा मलिकांनी दिला आहे.
Nawab Malik on Devendra Fadnavis Vidhansaha Election 2024
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांना ‘बटेंगे तो कटेंगे’ मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं
- ‘हो, अजित पवारांसोबत 100 टक्के मतभेद’; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती
- ‘माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं’ – अब्दुल सत्तार