Ambadas Danve | राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर राज्यात अनेक ठिकाणी मोठया घडामोडी घडत आहे. शरद पवार गटाचे अनिल देशमुख, अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे आणि नांदेडमध्ये एका उमेदवारावर दगडफेक करण्यात आली आहे.
Raju Shinde Vs Sanjay Shirsat Maharashtra Vidhan Sabha Election 2024
दरम्यान, छत्रपती संभाजनगरमध्ये मतदान न करण्यासाठी 1500 रुपये वाटप करून बोटावर शाई लावून, मतदान कार्ड आणि आधार कार्ड जमा केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी केला आहे.
शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप झाल्याचा आरोप होत आहे. मतदान कार्ड आणि आधार कार्ड जमा करून मतदान न करण्यासाठी मतदारांना 1500 रुपये वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Ambadas Danve X पोस्ट
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सर्व प्रकारावर सोशल मीडिया, एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, “छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे.
या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी.” अशी मागणी केली आहे.
Ambadas Danve Maharashtra Vidhan Sabha Election 2024
महत्वाच्या बातम्या