🕒 1 min read
मुंबई । Ajit Pawar vs Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेसने जनसन्मान यात्रा नाशिक येथून सुरु केली आहे. यावेळी यात्रेचे प्रमुख आकर्षण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा गुलाबी रंगाचा पेहराव चर्चेत आला आहे. पवारांच्या ताफ्यात असलेले वाहनेही गुलाबी आहेत. सोबतच यात्रेतुन महिलांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असल्याचा पाडा वाचला जातोय.
अजित पवार यांच्यामुळे गुलाबी रंग चर्चेत आला आहे. पण महाराष्ट्रात गुलाबी रंगाचा प्रयोग भारत राष्ट्र समिती म्हणजेच तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी करून झाला आहे. राज्यात अतिशय वेगाने BRS पक्षाने पक्ष विस्ताराला सुरुवात केली होती. जाहिराती, जाहिरातीचे मोठमोठे होर्डिंग्स, ताफ्यातील वाहनांच्या लांबच-लांब रांगा, शेतकऱ्यांनासाठी मोफत योजनांचे आश्वासने याने के. चंद्रशेखर राव यांचा BRS पक्ष राज्यात चांगलाच चर्चेत आला होता.
तेलंगणाच्या जनतेने बीआरएसला सत्तेवरून पायउतार केले. तिकडे सत्ता गेली आणि इकडे राज्यातील नेत्यांचे गुलाबी स्वप्न भंगले. तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालानंतर बीआरएसचे राज्यातील प्रभारी, पदाधिकारी व कार्यकर्ते नेमके कुठे गेले? महाराष्ट्रात या पक्षाचे भवितव्य काय? BRS माध्यमातून आपले राजकीय पुनर्वसन होईल अशी मनीषा बाळगून असणाऱ्याचे काय होईल, असे अनेक प्रश्न राजकीय जाणकार उपस्थित करतात.
महाराष्ट्रात जितका वेळ घालवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला गेला तितकाच वेळ जर आपल्या राज्यात दिला असता तर सत्त गेली नसती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ज्या वेगाने के. चंद्रशेखर राव यांचा BRS पक्ष राज्यात आला त्याच्या दुप्पट वेगाने हा पक्ष राज्यातील राजकारणातून गायब झाल्याचे चित्र आहे.
हाच गुलाबी रंग आता महाराष्ट्रात पुन्हा दिसू लागल्याने ही सर्व चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजनांचा पाऊस पाडत आहेत. राज्यावर 7 लाख 11 हजार 278 कोटी रुपयांच्या वर कर्ज असतांना फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेवून या योजना आणल्या जात असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. राष्ट्रवादी सत्तेत असेल तर या योजना सुरु राहतील, विरोधक सत्तेत आले तर ते योजना बंद करतील असा प्रचार अजित पवार करत आहेत.
सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपा सोबत का गेली, हे अजित पवार लोकांना पटवून देत आहेत. सत्ता असेल तर विकास होतो, मग विकासासाठी सत्तेत गेलो तर काय चूक केली? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्रातील जनतेला करत आहेत. सत्तेत असले तर आमदारांना भरघोस निधी देता येतो. विकासकामांना गती मिळत असल्याचे अजित पवार सांगतात.
लोकशाहीत विरोधी पक्षांना काहीच किंमत नाही, असे पटवून देण्याचं प्रयत्न अजित पवार करत आहे का? असा प्रश्न आता राजकीय जाणकार, राज्यातील जनता करत आहे. २ ० २ ४ ला जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर अजित पवार पुन्हा विकासाचे कारण देऊन सत्तेत जातील? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. ‘ज्याची ‘सत्ता’ अजित पवार त्यांचे’ असे नवीन सूत्र महाराष्ट्रात उदयास येत आहे का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी विरोधीपक्षात असणाऱ्या अजित पवारांनी भाषण करत शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर दादांचा ‘तो’ व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.
Ajit Pawar काय म्हणाले ? vs Sharad Pawar । NCP । Maharashtra Politics
ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला. शिवाजी पार्कमध्ये काढलेला पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहचवला. त्यांचाच पक्ष काढून घेतला. त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगानं दिलं असले तरी जनतेला पटलेय का? त्याचाही विचार झाला पाहिजे? धमक होती तर पक्ष काढा ना? तुम्हाला कुणी अडवलं होतं? असे अजित पवार व्हिडीओत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लाडकी ‘बायको’ नसते तर लाडकी ‘बहीण’चं असते; निर्लज्ज सरकारला महिला समजल्या नाही
- शेतीचं वीजबिल भरू नका; मग दादा बंद ‘सौर कृषीपंप योजने’चा लाभ घ्यायचा तरी कसा?
- लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते ‘या’ दिवशी होणार जमा; किती आणि कोणाला मिळणार पैसे? वाचा बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












