Share

शेतीचं वीजबिल भरू नका; मग दादा बंद ‘सौर कृषीपंप योजने’चा लाभ घ्यायचा तरी कसा? 

Ajit Pawar । New Applications for Solar Agriculture Pumps Currently Closed

Published On: 

Ajit Pawar । New Applications for Solar Agriculture Pumps Currently Closed

Ajit Pawar | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक प्रश्न भेडसावत असतात. त्यातील मुख्य बाजारभाव, वीज, कर्ज आणि पिकांना लागणारी खते या प्रमुख समस्या शेतकऱ्यांसमोर असतात. विजेचा लपंडाव आणि भारनियमामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

निवडणुका आल्या की, राज्याला भारनियम मुक्त करू, शेतीला मोफत वीज, वीजबिल माफ असे अनेक हातखंडे वापरून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन राजकारणी करतात. प्रत्याक्षात मात्र कधीच हि आश्वासने पूर्ण होत नाहीत. पिकांना सर्वात जास्त पाण्याची गरज हि उन्हाळ्यात आणि पीक लागवडी वेळी असते, नेमके त्याच वेळी सरकार ‘वीजबिल भरा मोहीम’ राबवते आणि बिल न भरल्यास शेतकऱ्यांचे वीज बंद करून टाकते.

दरम्यान, आता अजित पवारांनी शेतकऱ्यांना थकीत असलेले वीजबिल भरू नका, कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला सांगा अजितदादाने ( Ajit Pawar )सांगितलंय, असे फर्मान सोडले आहे.

अजित पवार म्हणाले,” राज्यातील शेतकऱ्यांना आता शेतीसाठीच्या वीजेचे बील भरावे लागणार नाही. कारण आपण सौरपंपाची योजना सुरु केली आहे. त्यामुळे आतापर्यंत शेतीच्या पंपाचे आलेले बिल भरण्याची गरज नाही. यापुढेही हे बिल भरावे लागणार नाही. कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला सांगा अजितदादाने सांगितलंय, असे पवारांनी स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar । New Applications for Solar Agriculture Pumps Currently Closed

अजित पवारांनी सांगितलेल्या सौरपंपाची योजनाचा आधीच फज्जा उडाला आहे. सध्यस्थितीत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ३/५/७.५ अश्वशक्ती पारेषण विरहित सौर कृषी पंपासाठी नवीन अर्ज स्वीकारणे बंद आहे.

Ajit pawar,solar agriculture pumps

अजित पवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फसवत असल्याची चर्चा

ही एक प्रकारची फसवणूक नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अजित पवारांनी शेतकऱ्यांना आवाहन केल्यानंतर शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप योजनांची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मात्र, त्यांना ही योजना सध्या तरी बंद असल्याचे उत्तर मिळत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या विधानातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

जनसन्मान यात्रेच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांनी केलेल्या या व्यक्तव्याने ते अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सरासरी ५  ते ६  कोटी शेतकऱ्यांपैकी आतापर्यन्त अंदाजे २  लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला असल्याचे महावितरण मेडाचे अधिकारी सांगतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install