Share

Vinesh Phogat अपात्रतेचे मोठे कारण आले समोर; फोगट कुटुंबियांचा गंभीर आरोप

Vinesh Phogat Disqualified From Paris Olympic 2024

Published On: 

vinesh phogat disqualified Paris Olympics 2024 reason

🕒 1 min read

Vinesh Phogat Disqualified | भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या कुस्ती स्पर्धेतून (५० किलो वजनी गट) अपात्र ठरवण्यात आले आहे. आता तिच्या अपात्रतेवर कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेशच्या कुटुंबीयांनी ब्रीजभूषण शरण सिंह आणि कुस्ती महासंघावर षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे.

विनेश फोगाटचे सासरे राजपाल राठी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ”100 ग्रॅम वजन किती जास्त असतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅम वजन वाढू शकतं. सरकार आणि ब्रीजभूषण शरण सिंह यांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप राठी यांनी केला आहे.

राजपाल राठी म्हणाले की, “ही हृदयद्रावक बातमी असून त्यावर राजकारण केलं जात आहे. हे एक मोठं षडयंत्र आहे. यात सरकारचा हात आहे. 100 ग्रॅम वजनामुळे कोण बाहेर काढतं? डोक्यावरच्या केसांमुळेही 100 ग्रॅमपर्यंत वजन वाढतं. सपोर्ट स्टाफनं कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही.

ते पुढे म्हणाले, “मी अद्याप विनेश फोगटशी बोललो नाही. माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचं विनेशनं वारंवार सांगितलं होतं. फोगटनं जयपूर आणि इतर ठिकाणी अनेकदा हे वक्तव्य केलं आहे. फोगटला अपात्र ठरवल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत. होय. काल ज्यावेळी मॅच झाली, त्यावेळी वजन का वाढलं नाही?”

Vinesh Phogat disqualified Reason Paris Olympics 2024

Paris Olympics 2024 मध्ये विनेशने काल 50 किलो वजनी गटातून जगातील अव्वल तीन कुस्तीपटूना हरवून फायलनमध्ये पोहोचली होती. परंतु ऑलिम्पिक नियमानुसार वजनाची जी मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेशच वजन 50 किलो 100 ग्रॅम पेक्षा जास्त वाढल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. ऑलिम्पिक नियमानुसार रेसलरला वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!