Share

‘शिवसेना’ पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळणार; मोठ्या वकिलाच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Uddhav Thackeray will get the ‘ShivSena’ party but will freeze the bow and arrow symbol । MLA Disqualification Case Shivsena । Asim Sarode । Supreme Court

Published On: 

MLA Disqualification Case Shivsena Supreme Court

ShivSena । शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज सुरु होणार होती. आमदार अपात्रता प्रकरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता शिवसेनेने ( एकनाथ शिंदे गट ) केली होती, परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नव्हती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज एकत्र होणार होती.

अजित पवार गटाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालवधी वाढवून मागितला आहे. तसेच अजित पवार गटाच्या वकिलांनी ही सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती केली होती. ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी तीन ते चार आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख 14 ऑगस्ट असण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray will get the ‘ShivSena’ party but will freeze the bow and arrow symbol

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, ” येत्या 14 ऑगस्टला सुप्रीम कोर्ट थेट निकाल देण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल. तर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं जाईल”, असा दावा असीम सरोदे यांनी केली.

पुढे बोलतांना सरोदे म्हणाले ”विधानसभा निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाला तो निकाल लावावा लागेल. अन्यथा सुप्रीम कोर्टाची नाचक्की होईल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जाणूनबुजून लांबणीवर टाकलं जातंय का? हा प्रश्न उपस्थित होईल”, असे असीम सरोदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install