🕒 1 min read
ShivSena । शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज सुरु होणार होती. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील आजची होणारी सुनावणी आता तीन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख लवकरच देऊ असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज एकत्र होणार होती. आमदार अपात्रता प्रकरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता शिवसेनेने ( एकनाथ शिंदे गट ) केली होती, परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही.
ShivSena MLA Disqualification Case supreme court postpones Hearing plea for two week
त्यानुसार, अजित पवार गटाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालवधी वाढवून मागितला आहे. तसेच अजित पवार गटाच्या वकिलांनी ही सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती केली होती. ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरे यांना आरक्षण काय आहे कळते का?; ‘चिल्लर म्हणा आणि सोडून द्या’ – मनोज जरांगे
- राज ठाकरेंनी मराठा समाजाची माफी मागावी; ठाकरेंविरोधात धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक
- विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











