Share

राज ठाकरे यांना आरक्षण काय आहे कळते का?; ‘चिल्लर म्हणा आणि सोडून द्या’ – मनोज जरांगे

Manoj Jarange vs Raj Thackeray statement on maratha reservation

Published On: 

manoj jarange vs raj thackeray statement on maratha reservation

🕒 1 min read

Manoj Jarange vs Raj Thackeray । राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची आवश्यकता नाही, असं वक्तव्य केल्याने त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. राज ठाकरेंवर टाडा लावून अटक करा, राज ठाकरेंची वक्तव्य ही समाज दुभंगण्याची आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. असं म्हणत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे यांची अटकेची मागणी केली आहे.

ठाकरे यांच्या या वक्तव्यावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीही टीका केली आहे. “मला त्यातले काही माहीत नाही. बोलणारे बोलत असतात. मराठ्यांनी ध्यान द्यायचे नाही. आपले काम करत राहायचे. डायव्हर्ट करण्यासाठी हे कुटाने सुरू करत आहेत आणि राज ठाकरे पण सत्तेचे एक भाग आहेत, अंग आहेत. चिल्लर म्हणायचे आणि मराठ्यांनी सोडून द्यायचे. पुढच्या 2024 च्या लढाईसाठी मराठ्यांनी संयम बाळगावा”, असा सल्ला मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांनी दिला.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावर जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलक आज धाराशिवमध्ये ते थांबलेल्या हॉटेलमध्ये गेले. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्यास आधी विरोध केला. त्यामुळे मराठा आंदोलकांनी तिथेच ठिय्या मांडला.

राज ठाकरेंनी मराठा समाजाची माफी मागावी, मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती.

Raj Thackeray यांना आरक्षण काय आहे कळते का? – Manoj Jarange

यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “त्यांना काय जाब विचारायचा? त्यांना आरक्षण काय आहे कळते का? हे गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात सुरू केलेल्या अभियानाचा हा भाग आहे. श्रीमंत राजकारण्यांना गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार. हे श्रीमंत लोक पैशांच्या गादीवर झोपणारे आहेत. यांना आरक्षण काय कळणार आहे ते आमच्या भावनेशी खेळतात. गोरगरिब मराठ्यांना आरक्षण मिळावं हा आमचा आक्रोश आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“आमची भगिनी रडत असेल तर, त्याला भंपकपणा वाटतो. यांना वेदना नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे काय आंदोलन करायचं आणि त्यांना काय भेटायचं. आपला मराठा खूप मोठा आहे असे कोणालाही विचारायला जायचे नाही. कोणालाही किंमत द्यायची नाही. त्याच्या काय पाया पडायचे, यांच्या तोंडापुढे उभे राहायचे नाही. सर्वांनी शांत राहून संयम ठेवावा. यांना काही किंमत द्यायची नाही”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!