Share

महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही – राज ठाकरे

Raj Thackeray | There are so many things in Maharashtra that there is no need for reservation. Most of our money is being spent on outsiders. Thane district is the only district in the country where there are 7-8 municipalities. So did the people of Thane increase the population here? This population was increased by outsiders.

Published On: 

Maharashtra does not need reservation MNS raj thackeray statment

Raj Thackeray । महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून सध्या ते सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रामध्ये इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहेत की, तिथे आरक्षणाची गरज नाही. पुणे, नागपूर या ठिकाणी फ्लायओव्हर वगैरे सुविधा का होतात? मूळच्या लोकांसाठी नाही होत, बाहेरून आलेल्यांसाठी होतात. त्याचबरोबर ठाणे हा जगातील एकमेव जिल्हा आहे ज्या ठिकाणी ७ ते ८ महानगरपालिका आहेत. ही लोकसंख्या काही ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्यांचाच खूप मोठा लोंढा आहे. आपला पैसा बाहेरील लोकांची व्यवस्था करण्यातच जातो अशी खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे .

सध्या तरुणांच्या नोकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे. आधी इथल्या तरुणांना नोकऱ्या द्या नंतर बाहेरच्या तरुणांना द्या. फ्लायओव्हर बजेट आलं त्यामध्येही गुजरात आणि युपीला प्राधान्य दिलं. असं कसं चालेल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना सारखं पाहिलं पाहिजे. एखादा प्रकल्प आला की गुजरातला न्यायचा आणि नव काही आले की गुजरातला न्यायचं हे करणं बंद करावं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही