Share

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर

Raj Thackeray announced two candidates for assembly elections | Bala Nandgaonkar is going to be nominated by Maharashtra Navnirman Sena in Shivdi Assembly Constituency in Mumbai. Dilip Dhotre from Pandharpur will be nominated for the Legislative Assembly

Published On: 

Raj Thackeray announced two candidates for assembly elections

🕒 1 min read

Raj Thackeray । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांच्या नावांची देखील घोषणा केली आहे. मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील शिवडी विधानसभा मतदार संघात बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. तर पंढरपुरातील दिलीप धोत्रे यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल घोषणा केली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून मनसेने दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता दिलीप धोत्रे हे भाजप आमदार समाधान अवताडे यांच्याविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे पंढरपुरात भाजप विरुद्ध मनसे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Raj Thackeray announced two candidates for assembly elections

मनसेने मुंबईमधील शिवडी विधानसभा मतदारसंघातुन बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही