🕒 1 min read
Laxman Hake | Raj Thackeray यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून सध्या ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रामध्ये इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहेत की, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून मराठा आणि ओबीसी आंदोलकांच्या रडारवर ठाकरे आले आहेत.
धाराशिवमध्ये राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घालत मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी केली होती. यावेळी भेटीला गेलेल्या मराठा आंदोलकांना राज ठाकरेंनी अरेरावी केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान आता ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आरक्षणाबाबतच्या विचारांची मला कीव येते. राज ठाकरे हे मनसे पक्ष संपवायला मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का? राज ठाकरे तुम्ही खरंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का?, असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
नेमके काय म्हणाले होते Raj Thackeray?
महाराष्ट्रामध्ये इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आहेत की, तिथे आरक्षणाची गरज नाही. पुणे, नागपूर या ठिकाणी फ्लायओव्हर वगैरे सुविधा का होतात? मूळच्या लोकांसाठी नाही होत, बाहेरून आलेल्यांसाठी होतात. बाहेरून येणाऱ्यांचाच खूप मोठा लोंढा आहे. आपला पैसा बाहेरील लोकांची व्यवस्था करण्यातच जातो अशी खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे .
चिल्लर म्हणा आणि सोडून द्या – Manoj Jarange
ठाकरे यांच्या या वक्तव्यावरुन मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीही टीका केली आहे. “मला त्यातले काही माहीत नाही. बोलणारे बोलत असतात. मराठ्यांनी ध्यान द्यायचे नाही. आपले काम करत राहायचे. डायव्हर्ट करण्यासाठी हे कुटाने सुरू करत आहेत आणि राज ठाकरे पण सत्तेचे एक भाग आहेत, अंग आहेत. चिल्लर म्हणायचे आणि मराठ्यांनी सोडून द्यायचे. पुढच्या 2024 च्या लढाईसाठी मराठ्यांनी संयम बाळगावा”, असा सल्ला मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांनी दिला.
Raj Thackeray यांना आरक्षण काय आहे कळते का?
मराठा आंदोलक ठाकरे यांना जाब विचारायला गेले होते, यावर मनोज जरांगे म्हणाले की, “त्यांना काय जाब विचारायचा? त्यांना आरक्षण काय आहे कळते का? हे गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात सुरू केलेल्या अभियानाचा हा भाग आहे. श्रीमंत राजकारण्यांना गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न नाही कळणार. हे श्रीमंत लोक पैशांच्या गादीवर झोपणारे आहेत. यांना आरक्षण काय कळणार आहे ते आमच्या भावनेशी खेळतात. गोरगरिब मराठ्यांना आरक्षण मिळावं हा आमचा आक्रोश आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“आमची भगिनी रडत असेल तर, त्याला भंपकपणा वाटतो. यांना वेदना नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे काय आंदोलन करायचं आणि त्यांना काय भेटायचं. आपला मराठा खूप मोठा आहे असे कोणालाही विचारायला जायचे नाही. कोणालाही किंमत द्यायची नाही. त्याच्या काय पाया पडायचे, यांच्या तोंडापुढे उभे राहायचे नाही. सर्वांनी शांत राहून संयम ठेवावा. यांना काही किंमत द्यायची नाही”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
राज ठाकरेंवर टाडा लावून अटक करा – प्रकाश आंबेडकर
राज ठाकरेंवर टाडा लावून अटक करा, राज ठाकरेंची वक्तव्य ही समाज दुभंगण्याची आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. असं म्हणत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे यांची अटकेची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार ‘गद्दार’…मृत्यूची वाट बघत होते; अशा व्यक्तीवर कसा विश्वास ठेवायचा
- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पुन्हा मोठा ट्विस्ट; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- राज ठाकरे यांना आरक्षण काय आहे कळते का?; ‘चिल्लर म्हणा आणि सोडून द्या’ – मनोज जरांगे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












