Share

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरची पदकांची हॅट्ट्रिक हुकली!

Manu Bhakar misses hat-trick of medals at Paris Olympics 2024 Manu Bhakar, who won two medals earlier, had entered the women’s 25m pistol event this time.

Published On: 

Manu Bhaker

🕒 1 min read

Manu Bhaker । पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत शेवटचा सामना खेळला होता. यापूर्वी त्याने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भाग घेतला होता. या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने कांस्यपदक पटकावले. मनू भाकरला २५ मीटर पिस्तुल प्रकारात आपली उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत ती चौथी राहिली. (Manu Bhaker Missed 3rd Medal In Paris Olympics 2024)

मनू भाकरची पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदकांची हॅटट्रिक हुकली. यापूर्वी दोन पदके जिंकणारी मनू भाकर यावेळी महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत मैदानात उतरली होती. मनूने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यापूर्वी दोन कांस्यपदक जिंकणाऱ्या मनूकडून यावेळी सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, २५ मीटर पिस्तुल प्रकारात पदक मिळवण्यापासून ती केवळ एका स्थानावर राहिली.

या स्पर्धेचा अंतिम सामना खेळत असलेल्या मनूने एकूण २८ गुणांसह चौथे स्थान पटकावले. पदक मिळवण्यापासून ती फक्त एका स्थानावर राहिली. मनूने तिसरे स्थान पटकावले असते तर तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून पदकांची हॅट्ट्रिक केली असती. मात्र, यावेळी तिला पदक जिंकता आले नाही. मात्र हे पदक जिंकता आले नसले तरी देखील मनू ही पहिली महिला भारतीय ठरली जिने शूटिंगमध्ये भारताला पदक जिंकवून दिले. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!