Share

‘अमित शहा हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Amit Shah is the political descendant of Ahmed Shah Abdali’, Uddhav Thackeray’s Statment

Published On: 

Amit Shah is the political descendant of Ahmed Shah Abdali', Uddhav Thackeray's Statment

Uddhav Thackeray On Amit Shah । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शनिवारी (03 ऑगस्ट) पुण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत. आजपासून मी अमित शहांना अब्दाली म्हणेन. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य सगळीकडे जोरदार चर्चेत आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे हिंदुत्ववादी लोक आहेत का? अमित शाह यांनी सांगावे की त्यांचे हिंदुत्व कसे आहे? अब्दालीचे वंशज पुण्यात आले आणि बोलले. अमित शहा यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का? भाजपचे हिंदुत्व कसे आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला इतरांची घरे जाळू नयेत अशी शिकवण दिली आहे. ज्यांनी विश्वासघात केला ते हिंदू नाहीत, असे शंकराचार्यांनी म्हटले होते.” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackeray On  Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी कोणत्याही बगळ्याला आव्हान देत नाही. तुमच्यात क्षमता नाही. एकतर तुम्ही राहा, नाहीतर मी राहीन या विधानावर काही लोकांना असे वाटले की मी त्यांना आव्हान देत आहे. मात्र कोणत्याही बगळ्याला आव्हान देत नसून मी सुसंस्कृत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो,असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install