🕒 1 min read
Amol Mitkari VS MNS । अजित पवार (Ajit Pawar) गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्याविरोधात मनसेची आक्रमकता वाढली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली होती. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांना ‘सुपारीबाज’ म्हंटले होते. मिटकरी यांच्या या टीकेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.
अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जहरी शब्दात टीका केली. “मनसे पक्ष पळपुट्यांचा, सोंगाड्यांचा आहे. नागपुरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या विकृत कृत्याच प्रकरण समोर आलय, लवकरच तुम्हाला ते समजेल” असं अमोल मिटकरी म्हणाले. ‘शेवटी मनसे हा सुपारीबाज, गुंडशाही, झुंडशाही आणि बेवडेशाही असलेल्यांचा पक्ष आहे’ अशी टीका मिटकरींनी केली.
यावर मनसे नेते योगेश चिले यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले” शरद पवारांनी कोर्टात केस जिंकली तर अजित पवारांनी ७० हजार कोटींचा झोल केलाय ना, त्या झोलर अजित दादांना कटोरा घेऊन फिरावं लागेल. माझ्या पक्षाला नाव द्या,चिन्ह द्या बोलत. त्यामुळे दुसऱ्याकडून भिकेवर मिळालेला पक्ष, त्यावर जास्त उडू नका, तुला ( अमोल मिटकरी ) आमदारकी मिळाली ती शरद पवारांच्या भिकेवर मिळाली आहे, अशी टीका योगेश चिले यांनी केली आहे.
त्यावरही अमोल मिटकरींनी उत्तर दिलं. “चिले, पिले, ही बांडगुळ नवीनच ऐकतोय. त्यांची औकात काय? देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची औकात काय? घरात बायको इज्जत देत नाय आणि हे अजित पवारांवर भुंकायला लागलेत”
“अरे, चिल्या तुझे दुधाचे ओठ सुकलेले नसतील. अजितदादांवर टीका केलीना बेट्या तुझ्या राज ठाकरेने तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत, लक्षात ठेव” असं अमोल मिटकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य – एकनाथ शिंदे
- राहुल गांधींची जात विचारून एससी, एसटी, ओबीसी समाजाचा अपमान; नरेंद्र मोदींनी समाजाची माफी मागावी
- कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील महाराष्ट्राचा अभिमान!; नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












