Share

अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या गाड्या फोडा, चिल्लर लोकांच्या काय फोडता? : प्रकाश आंबेडकर

sharad pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, ajit pawar आणि eknath shinde यांच्या गाड्या फोडा, असे आवाहन Prakash Ambedkar यांनी केले आहे.  

Published On: 

Prakash Ambedkar , devendra fadnavis eknath shinde, ajit pawar

Prakash Ambedkar । महाराष्ट्रात दोन आमदारांच्या गाड्या फोडल्याच्या घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची गाडी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी फोडली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडली होती.

या घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली होती. नाराज संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडली. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असं वक्तव्य केलं होतं. त्यांची ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संतापात अमोल मिटकरी यांची अकोल्यात गाडीची तोडफोड केली होती.

यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्तव्य केले आहे. ते म्हणाले,” चिल्लर लोकांच्या गाड्या फोडण्यापेक्षा शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गाड्या फोडण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

काय म्हणाले Prakash Ambedkar?

“आता मिटकरी कुठल्या पक्षात आहेत? अजित पवार गटात आहे. जितेंद्र आव्हाड कोणत्या गटात आहेत? शरद पवार गटात आहेत. गाड्या फोडणाऱ्यांना माझं आवाहन आहे, अरे चिल्लर लोकांच्या का गाड्या फोडत आहात? या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावे देतो, त्यांच्या गाड्या फोडा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गाड्या फोडा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install