🕒 1 min read
Ajit Pawar : मी शब्द फिरवत नाही. एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झाले तरी मागे हटत नाही, हा अजित दादाचा वादा आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये केले आहे.
अजित पवारांच्या उपस्थितीत कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात 736 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यातून ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, मी सत्तेला हापापलेला कार्यकर्ता नाही. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याने 2 हजार 200 कोटींचा निधी कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यांना दिला आहे. या आधीच्या आमदारांनी काय केले आहे? महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे. आर्थिक बाबतीत महिला सक्षम झाल्या पाहिजेत. अडीच लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मदत देण्याची भूमिका मी मांडली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यानंतर रक्षाबंधनाच्या जवळ दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत, असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिले.
हा अजित दादाचा वादा । Ajit Pawar
पवार पुढे म्हणाले की, आम्ही शेतकरी आहोत. गोरगरिबांच्या विकासासाठी 46 हजार कोटी खर्च करावा लागणार आहे. हा चुनावी जुमला असल्याचे विरोधक बोलताय, पण तसे नाही. मी शब्द फिरवत नाही. एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झाले तरी मागे हटत नाही, हा अजित दादाचा वादा आहे. असे म्हणत अजित पवारांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी केली.
महत्वाच्या बातम्या
- ७० हजार कोटींचा झोलर अजित पवारांना कटोरा घेऊन फिरावं लागेल – मनसे
- शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य – एकनाथ शिंदे
- राहुल गांधींची जात विचारून एससी, एसटी, ओबीसी समाजाचा अपमान; नरेंद्र मोदींनी समाजाची माफी मागावी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












