बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन! पण, जेव्हा पाठीराखा भाऊच या जगात नसतो, तेव्हा बहिणीच्या मनाची अवस्था नक्की काय होत असेल? आज देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह असला तरी, महाराष्ट्रातील पवार कुटुंबासाठी मात्र हा सण अश्रूंचा ठरलाय. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपले दिवंगत भाऊ, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आठवणीत एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
Supriya Sule Raksha Bandhan Post
अवघ्या सात महिन्यांपूर्वी झालेल्या एका भीषण विमान अपघातात अजित पवार यांचं अचानक निधन झालं होतं. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेची पोकळी आजही कुटुंबात कायम आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, “प्रिय दादा… आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे.
“सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि दादांचं अचानक निघून जाणं, यावर आजही आपला विश्वास बसत नसल्याचं सुप्रियाताईंनी नमूद केलंय. लहानपणापासूनची भांडणं आणि एकमेकांवरचं प्रेम हाच नात्याचा पाया होता. “आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील,” या त्यांच्या शब्दांनी अनेकांच्या काळजाला हात घातलाय.
दादांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. ‘तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे’, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनीही भावुक प्रतिक्रिया दिल्या असून, ‘असे दादा पुन्हा होणे नाही’ अशा शब्दांत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘हे देवेंद्र, हे नरेंद्र…’; समय रैनाचा सत्कार होताच सुनिल पाल भडकला, सरकारलाच विचारले खडे सवाल!
- श्वेता तिवारीने मानले थेट राज ठाकरेंचे आभार; मनसे कार्यकर्त्यांबद्दलच्या ‘त्या’ दाव्यानंतर नेमकं काय घडलं?
- Nepal Flood: नेपाळवरील संकट कायम; 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











