Share

‘हे देवेंद्र, हे नरेंद्र…’; समय रैनाचा सत्कार होताच सुनिल पाल भडकला, सरकारलाच विचारले खडे सवाल!

समय रैनाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार झाल्याने सुनिल पालने संताप व्यक्त करत सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

Published On: 

Sunil Pal Angry Reaction On Samay Raina Honoured By Devendra Fadnavis

शिवीगाळ करणाऱ्याला थेट सरकारी सन्मान? होय, असंच काहीसं घडलंय आणि यामुळे आता मोठा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. ‘इंडियाज गॉट लेटंट’ फेम समय रैनाचा (Samay Raina) नुकताच महाराष्ट्र सरकारकडून सत्कार झाला आणि यावरूनच आता कॉमेडियन सुनिल पाल (Sunil Pal) चांगलाच भडकला आहे.

काही दिवसांपूर्वीच समय रैनाच्या शोवर प्रचंड टीका झाली होती. त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, कोर्टाचे आदेश आले. पण, आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचा सन्मान झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळेच… सुनिल पालने एक व्हिडीओ शेअर करत सरकारलाच थेट जाब विचारलाय.

Sunil Pal On Samay Raina

बुधवारी महाराष्ट्र सायबरच्या एका कार्यक्रमात हा सत्कार पार पडला. यावर उद्विग्न प्रतिक्रिया देताना सुनिल पाल म्हणाला, “घोर कलियुग आलंय, घोर कलियुग! तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीसाठी त्याचा सन्मान करताय? तो आणि त्याचे पॅनलिस्ट शोमध्ये अश्लील शिवीगाळ करतात. अशा माणसाचा सन्मान करून तुम्ही तरुणांना काय संदेश देणार आहात?”

“आधी शिव्या द्या, पोलिसांत केस करून घ्या, मग तुमचा शो हिट होईल आणि शेवटी जे सरकार विरोधात होतं, तेच तुमचा सन्मान करेल,” असा घणाघाती टोलाही त्याने लगावला. “हे देवेंद्र, हे नरेंद्र, काय चाललंय हे?” असा सवाल त्याने व्हिडीओतून केलाय.

दुसरीकडे, समय रैनाने सायबर अवेअरनेसच्या कार्यक्रमात हजेरी लावत फडणवीसांसोबत मंचावर हसतखेळत संवाद साधला. त्याने आपल्या खास शैलीत ‘लेटंट’ वादाचा उल्लेखही केला. पण, आता सुनिल पालच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मनोरंजन विश्वात नवी चर्चा सुरू झालीय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही