Shreyanka Patil : सोशल मीडियावर डान्स रील टाकल्यावर ट्रोल होणं, हे आजकाल नवीन नाही. पण, भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज श्रेयांका पाटीलने या ट्रोलर्सना थेट शब्दांत सुनावलंय.
नुकताच तिने २०१३ मधील ‘शूटआउट ॲट वडाला’ चित्रपटातील ‘बबली बदमाश है’ या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर काहींनी जोरदार टीका केली. पण श्रेयांकाला याने काहीही फरक पडत नाही. “मी यशस्वी होतेय, म्हणून लोक जळतात,” असा सणसणीत टोला तिने लगावलाय.
Shreyanka Patil hits back at trolls over dance reels
श्रेयांका म्हणाली, “माझ्यावर टीका करा किंवा कौतुक करा, मला काही फरक पडत नाही. उलट, यामुळे मला अधिक लक्ष वेधून घेता येतं. मला डान्स करायला, इन्स्टाग्रामवर राहायला आणि माझ्या आवडीचे कपडे घालायला खूप आवडतं,” असं ती म्हणाली. टीकाकारांकडे लक्ष न देता स्वतःच्या आनंदावर लक्ष केंद्रित करण्याचं तिने ठरवलंय.
दुखापतीचं ग्रहण अन् क्रिकेट सोडण्याचा विचार
दुसरीकडे, सोशल मीडियावर नेहमी हसतमुख दिसणाऱ्या श्रेयांकाने क्रिकेटच्या मैदानावर मात्र मोठा संघर्ष पाहिलाय. तब्बल १६ महिन्यांनंतर तिने आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन केलं होतं. पण, जूनमध्ये पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिला इंग्लंडमधील टी-२० विश्वचषकाला मुकावं लागलं. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. “मला क्रिकेटच सोडायचं होतं. मी माझे प्रशिक्षक अर्जुन देव यांच्याशीही तसं बोलले होते. सारखी दुखापत का होतेय? हा प्रश्न मला सतावत होता,” असं तिने भावूक होत सांगितलं.
पण, त्यानंतर एका वेब सीरिजने तिचं आयुष्य बदललं. जिमी शेरगिलची ‘ऑपरेशन सफेद सागर’ ही सीरिज तिने पाहिली. “तिथे सैनिक देशासाठी एका सेकंदात आपला जीव पणाला लावतात. मग मी का रडत बसू? इथे एखादा दिवस वाईट गेला, तरी दुसऱ्या दिवशी मैदानावर उतरण्याची संधी असतेच,” अशी नवी ऊर्जा तिला मिळाली.
गेले दोन महिने ती मैदानापासून दूर आहे. युएईमध्ये होणाऱ्या महिला आशिया चषकातही ती खेळणार नाही. मात्र, जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी तिची संघात निवड झालीय. अर्थात, खेळणं तिच्या फिटनेसवर अवलंबून असेल. डब्ल्यूपीएलमध्ये आरसीबीला २०२४ आणि २०२६ मध्ये विजेतेपद मिळवून देण्यात तिने मोलाची भूमिका बजावली होती. आता ती पूर्णपणे फिट होऊन मैदानात कधी परतते, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- बिडकीनमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा अभूतपूर्व उत्साह! भव्य जलूसमध्ये तरुणाईचा लक्षणीय सहभाग
- संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून
- नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











