Rakhi Sawant । बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असते. मागील काही दिवसांपूर्वी राखी सावंतने तिसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, आता तिच्या अडचणी वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.
याला कारण आहे कॉमेडियन समय रैनाचा (Samay Raina) इंडियाज गॉट लेटेंट (India’s Got Latent) शो. या शोमध्ये युट्युबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahabadia) आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याने हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामुळे समय रैनासह सर्वांविरोधात तक्रारी दाखल झाल्या.
महाराष्ट्र सायबर सेलने (Maharashtra Cyber Cell) रणवीर अलाहाबादिया, समय रैना यांच्यासह राखी सावंतला देखील समन्स पाठवले आहे. राखी सावंतने इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. तिचा एपिसोड देखील अडचणीत सापडला आहे.
याच कारणामुळे महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला 27 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महाराष्ट्र सायबर सेलचे आयडी यशस्वी यादव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Rakhi Sawant summoned by Cyber Cell for controversial statement
दरम्यान, इंडियाज गॉट लॅटेंट शो मध्ये रणवीर अलाहाबादिया याने आई-वडिलांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने सामाजिक स्तरापासून ते राजकीय नेत्यांमध्ये एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आता पोलीस सध्या कसून चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :