Share

“दमानियांची ग्रामपंचायतीला निवडून येण्याची तरी…”; Dhananjay Munde यांच्यासाठी सदावर्ते मैदानात

Gunaratna Sadavarte has targeted Anjali Damania, who has been demanding the resignation of Dhananjay Munde.

by MHD

Published On: 

Gunaratna Sadavarte on Anjali Damania over Dhananjay Munde resignation demand

🕒 1 min read

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांची विरोधक राजीनाम्याच्या मागणीवरून कोंडी करत आहेत. नुकताच त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी कृषीमंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेल्या कथित घोटाळ्याचा आरोप केला.

याप्रकरणी आता वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर जहरी टीका केली आहे. “आम्ही भगवान बाबांना मानणारे लोक आहोत. अंजली दमानिया किंवा अन्य कोणी म्हटल्यामुळे धनंजय मुंडे यांची खुर्ची कोणीही घेऊ शकत नाही,” असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

“धनंजय मुंडे हे लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यांच्यावर लाखो-करोडो लोक प्रेम करतात. अंजली दमानिया आधी तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिंकून दाखवून स्वत:ची उंची तयार करा. मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या अंजली दमानिया कोण?,” असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले की, “राज्याचे मंत्रिमंडळ कोणाच्या बापाच्या घरचं नसतं. हे मंत्रिमंडळ भारताच्या संविधानामुळे अस्तित्त्वात आले आहे. लोकांमधून लोक निवडले जातात आणि धनंजय मुंडे देखील लोकांमधून निवडून आले आहेत,” असेही गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केले.

Gunaratna Sadavarte on Anjali Damania

दरम्याम, गुणरत्न सदावर्ते यांनी अंजली दमानिया यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या आरोपांना अंजली दमानिया कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या