Share

Rahul Gandhi यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना चुकीचं अभिवादन केलं? काँग्रेसने दिले ‘हे’ उत्तर

by MHD
Atul Londhe Clarifies Rahul Gandhi tweet on Chhatrapati Shivaji Maharaj

Rahul Gandhi । आज छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती असून राजकीय आणि सामाजिक सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना अभिवादन केले आहे. परंतु, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पोस्टवरून भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी X वर लिहितात, “छत्रपती शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी। उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा,” अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

यावर आता काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे. “राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक्सवर पोस्ट करताना श्रद्धांजली या शब्दाचा भाजपकडून बाऊ केला जात आहे. खऱ्या मुद्द्यावर भाजपला बोलायचं नाही. शिवाजी महाराज यांनी दिलेलं मुल्य, महिला युवा शेतकरी यांच्या मुळ मुद्यांवर भाजपला बोलायचं नाही. महिलांवर रोज बलात्कार होत आहेत. बेरोजगारी वाढली आहे, यावर भाजपला उत्तर द्यायचं नाही,” असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे.

Atul Londhe on BJP

“Humbul Tribute या इंग्रजी शब्दाचा अर्थ श्रद्धांजली असा झाला आहे. श्रद्धांजली हे सुद्धा आपण श्रद्धा अर्पण करतो या अर्थाने सन्मान देणारा शब्द असून राजकारण करायचं आणि त्यावर राजकीय पोळी कशी शेकायची, याचा प्रयत्न भाजप करत आहे,” असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Congress has strongly targeted BJP over Rahul Gandhi X post about Chhatrapati Shivaji Maharaj.

Marathi News Maharashtra Politics