Share

महाराष्ट्र निवडणुका फिक्स होत्या – राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi alleges Maharashtra elections were rigged, cites 41 lakh new voters in 5 months.

Published On: 

Rahul Gandhi Narendra Modi

दिल्ली | प्रतिनिधी – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका फिक्स होत्या, असा थेट आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. एका लेखाद्वारे त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाच मुद्द्यांच्या आधारे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदारसंख्येची आकडेवारीच विसंगत आहे. 2019 मध्ये 8.98 कोटी मतदार होते. त्यानंतर 2024 लोकसभा निवडणुकीत ही संख्या 9.29 कोटीवर गेली. पण फक्त पाच महिन्यांतच ती 9.70 कोटी झाली — म्हणजेच 41 लाखांनी वाढली. “ही आकडेवारीच अविश्वसनीय वाटते,” असं त्यांनी ( Rahul Gandhi ) स्पष्ट केलं.

Rahul Gandhi Alleges Rigging in Maharashtra Assembly Elections

त्यांनी हायकोर्टाच्या आदेशानंतर व्हिडिओग्राफीची मागणी झाल्यानंतर सरकारने 1961 च्या नियमांत बदल करत इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डवरच बंधन आणल्याची माहिती दिली. ही कारवाई निवडणुकीतील पारदर्शकतेला धक्का देणारी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“निवडणूक आयोग विरोधकांच्या गंभीर आरोपांवर मौन बाळगतोय. ही निवडणूक म्हणजे जणू मॅच फिक्सिंग होती. फिक्सिंगने संघ जिंकू शकतो, पण लोकशाहीचा आत्मा हरवतो,” असं राहुल गांधींचं म्हणणं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही